एक्स्प्लोर
IND vs BAN : कोहलीची 'विराट' कामगिरी; सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
कर्णधार विराट कोहलीने ऐतिहासिक कसोटी सामन्यात शतकी खेळी करत भारताची बाजू मजबूत केली आहे. या शतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
कोलकाता : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ऐतिहासिक कोलकाता कसोटीत खणखणीत शतक झळकावलं. डे-नाईट कसोटीत भारताकडून पहिलं शतक झळकावण्याचा मान विराटनं मिळवला. तायजुल इस्लामच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत 159 चेंडूत विराटनं शतकाला गवसणी घातली. त्याच्या या शतकी खेळीत 12 चौकारांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 27 शतकं झळकावण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. 141 डावांत विराटने आपलं 27 वं शतक झळकावलं आहे.
विराट रिकी पॉन्टिंगच्या विक्रमापासून केवळ एक शतक दूर
विराट कोहलीच्या कसोटी कारकीर्दीतलं हे आजवरचं 27वं कसोटी शतक ठरलं. तर त्याची आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या 70 वर जाऊन पोहोचली आहे. वन डे क्रिकेटमध्ये विराटच्या नावे 43 शतकांची नोंद आहे. सर्वाधिक कसोटी शतकांच्या यादीत विराटनं दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डर यांच्या शतकांशी बरोबरी साधली आहे. त्या दोघांनीही कसोटीत प्रत्येकी 27 शतकं ठोकली आहे. आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीतही विराट आता रिकी पॉन्टिंगच्या विक्रमापासून केवळ एक शतक दूर आहे. विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतलं हे 70वं कसोटी शतक ठरलं. सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 100 शतकांसह पहिल्या, तर पॉन्टिंग ७१ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
आनंद, कार्लसनच्या हस्ते कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भारताचा महान बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्या हस्ते ईडन गार्डन्सवरची बेल वाजवून आजच्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या दिवसाअखेरीस 3 गडी गमावल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने भारतीय डावाला सुरुवात केली. दोघांनीही टिच्चून फलंदाजी करत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. अजिंक्य रहाणे अर्धशतक झळकावल्यानंतर तात्काळ माघारी परतला. यानंतर विराटने रविंद्र जाडेजाच्या सोबतीने आपलं कसोटी कारकिर्दीतलं 27 वं शतक झळकावलं. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राअखेरीस भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 279 धावांपर्यंत मजल मारली असून सध्या भारताकडे 183 धावांची आघाडी आहे. संबंधित बातम्या - IND vs BAN I विराटचा अनोखा विक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार IND vs BAN 2nd Test : ऐतिहासिक डे-नाईट कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाचा! Z Bat launch | फलंदाजांसाठी आता तंत्रज्ञानाची साथ, सेन्सर चीप असलेल्या 'झी बॅट'चं अनावरण | ABP Majha20th Test century as Captain of India ✅ 27th Test century of his career ✅ 70th International century ✅ 41st international century as captain (joint-most)✅ 1st Indian to hit a century in day/night Test ✅#KingKohli pic.twitter.com/q01OKPauOu
— BCCI (@BCCI) November 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement