एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs BAN I विराटचा अनोखा विक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार
ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. यादरम्यान, विराटने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार आहे.
कोलकाता : ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत(पिंक बॉल कसोटीत)भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशीच बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर 4 बाद 174 अशी मजल मारली. त्यामुळं भारताने पहिल्याच दिवशी 68 धावांची आघाडी घेतली आहे. यासोबतच कर्णधार विराट कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. विराटने सुरु असलेल्या डे-नाईट कसोटीत कर्णधार या नात्याने 5 हजार धावांचा टप्पा पार केला. या कामगिरीसह कसोटी कर्णधार म्हणून पाच हजार धावा करणारा विराट हा भारताचा पहिला तर जगातला सहावा कर्णधार ठरला आहे. विराटने अवघ्या 86 डावात हा टप्पा गाठून सर्वात जलद 5 हजार धावा करणारा कर्णधार होण्याचाही मान मिळवला आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 8 हजार 559 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
दरम्यान जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्या भेदक आक्रमणासमोर कोलकात्याच्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटीत बांगलादेशचा संघ ढेपाळला. गुलाबी चेंडूवर पहिल्यांदाच खेळणाऱ्या बांगलादेशी फलंदाजांचा भारतीय वेगवान माऱ्यासमोर अजिबात टिकाव लागू शकला नाही. त्यामुळे केवळ 30.3 षटकांत बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. भारताकडून ईशांत शर्माने 22 धावांत सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडले. तर उमेश यादवने 29 धावांत 3 आणि मोहम्मद शमीनं 36 धावांत बळी घेतले. ईशांत शर्मानं वैयक्तिक चौथ्याच षटकात बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतर उमेश यादव आणि मोहम्मद शमीनं कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन आणि मुशफिकुर रहीम या तिघांनाही शून्यावर बाद करत बांगलादेशच्या डावाला सुरुंग लावला. उपाहारापर्यंत बांगलादेशची सहा बाद 73 अशी अवस्था झाली होती. उपाहारानंतर अवघ्या नऊ षटकांत भारताच्या वेगवान त्रिकुटानं बांगलादेशी तळाच्या फलंदाजांना गुंडाळलं. बांगलादेशच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. सलामीवीर शदमन ईस्लामने सर्वाधिक 29 धावांचे योगदान दिलं. लिटन दासने 24 तर नईम हसनने 19 धावा केल्या. संबंधित बातम्या - IND vs BAN 2nd Test : ऐतिहासिक डे-नाईट कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाचा! IND vs BAN 2nd Test : भारतीय गोलंदाजांची 'गुलाबी जादू', बांगलादेशचा 106 धावांत खुर्दा, ईशांतच्या पाच विकेट्स IND vs WI T20 and ODI Series : टीम इंडियाच्या शिलेदारांची घोषणा, भुवनेश्वर, शमीचं पुनरागमन Ajinkya Rahane | डे नाईट कसोटीआधी पिंक बॉल शेजारी ठेवलेला अजिंक्य रहाणेचा मजेशीर फोटो व्हायरल | ABP MajhaMilestone Alert🚨: @imVkohli completes 5000 Test runs as #TeamIndia captain. @Paytm #PinkBallTest #INDvBAN pic.twitter.com/fu7fozfoUu
— BCCI (@BCCI) November 22, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement