INDvsAUS: सपोर्ट स्टाफसह सर्व भारतीय खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; खेळाडूंचा सराव सुरु
भारतीय संघ सध्या 14 दिवस क्वॉरंटाईन असणार आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे पहिलीच कोरोना टेस्ट सर्व खेळाडूंची निगेटिव्ह आली आहे.
India On Australia Tour : ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेला भारतीय संघ आणि सर्व सपोर्ट स्टाफची कोविड 19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आजपासून टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात सराव करण्यासही सुरुवात केली आहे. या सराव सत्रात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, सलामीवीर पृथ्वी शॉ आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यासह अनेक खेळाडू सहभागी झाले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर खेळाडूंच्या आऊटडोअर सराव आणि जिम सत्राची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यात फिरकीपटू कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज उमेश यादव, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा सराव करताना दिसले. यासह वेगवान गोलंदाज टी नटराजन आणि दीपक चाहरही फोटोत दिसले.
Australia Tour | रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश, तर विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणारTwo days off the plane and #TeamIndia had their first outdoor session today. A bit of ???? to get the body moving! #AUSIND pic.twitter.com/GQkvCU6m15
— BCCI (@BCCI) November 14, 2020
भारतीय संघ सध्या 14 दिवस क्वॉरंटाईन असणार आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे पहिलीच कोरोना टेस्ट सर्व खेळाडूंची निगेटिव्ह आली आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही ट्विटरवर चायनामन कुलदीप यादव यांच्यासमवेत एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, "आपला भाऊ कुलदीप याच्यासह भारतीय संघात पुनरागमन. टीम इंडिया सराव करताना. हॅशटॅग कुलचा."
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यांचं वेळापत्रक
एकदिवसीय सामने
पहिला सामना- 27 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु) दुसरा सामना 29 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु) तिसरा सामना- 2 डिसेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
ट्वेंटी-ट्वेंटी सामने पहिला सामना - 4 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु) दुसरा सामना- 6 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु) तिसरा सामना - 8 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु) कसोटी सामने पहिला सामना- 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर (डे-नाईट सामना, सकाळी 8.30 वाजता सुरु) दुसरा सामना- 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर (पहाटे 4.30 वाजता सुरु) तिसरा कसोटी सामना- 7 जानेवारी ते 11 जानेवारी (पहाटे 4.30 वाजता सुरु) चौथा सामना- 15 जानेवारी ते 19 जानेवारी (पहाटे 5 वाजता सुरु)