एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2019 | इंग्लंडला ओव्हरथ्रोवर सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा : सायमन टॉफेल
न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
लंडन : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करुन पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं आहे. इंग्लंडच्या विजयात अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरील ओव्हरथ्रोसह मिळालेल्या सहा धावांनी निर्णायक भूमिका बजावली. परंतु आयसीसी पॅनेलवरचे माजी पंच सायमन टॉफेल यांनी सहा धावा देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या ओव्हरथ्रोवर इंग्लंडला सहा धावा बहाल करण्याचा मैदानातल्या पंचांचा निर्णय चुकीचा होता, असं खळबळजनक विधान सायमन टॉफेल यांनी केलं आहे.
इंग्लंडच्या डावात ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकात बेन स्टोक्सने आदिल रशिदच्या साथीने दोन धावा पळून काढल्या. त्याच वेळी मार्टिन गप्टिलने केलेल्या ओव्हरथ्रोवर, चेंडू स्टोक्सच्या बॅटवर आदळून सीमापार झाला. त्यावेळी पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या होत्या. यामध्ये स्टोक्स आणि आदिलने धावून काढलेल्या दोन धावा आणि ओव्हरथ्रोच्या चार धावांचा समावेश आहे. याचा फायदा इंग्लंडला मिळाला आणि सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये गेला.
World Cup 2019 | इंग्लंडच्या विजयानंतर आयसीसीच्या बाऊंड्री काऊंट नियमावर खेळाडूंची नाराजी
सायमन टॉफेल यांच्या मते, "त्यावेळी पंचांनी सहाऐवजी पाच धावा देणं अपेक्षित होतं. कारण गप्टिलने थ्रोची कृती केली, त्यावेळी स्टोक्स आणि रशिदने पहिली धाव पूर्ण केली होती. पण त्या दोघांनी दुसऱ्या धावेसाठी एकमेकांना ओलांडलं नव्हतं."
निश्चितच पंचांकडून चूक झाली आणि त्याचा फायदा इंग्लंडला मिळाला. कारण इंग्लंडच्या खात्यात केवळ धाव जमा झाली नाही तर स्टोक्सही स्ट्राईकवर परतला. जर त्यावेळी इंग्लंडला 6 ऐवजी 5 धावाच दिल्या असत्या, तर त्याला अखेरच्या दोन चेंडूत चार धावांची आवश्यकता असतील.
ICC World Cup 2019 : विजयानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली!
काय आहे आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नियम 19.8 नुसार, जर क्षेत्ररक्षकाचा ओव्हरथ्रो किंवा आणखी कोणत्या कारणाने चेंडू सीमारेषा पार गेल्यास संघाला..
- पेनल्टीच्या धावा
- चौकाराच्या धावा
- थ्रो करेपर्यंत फलंदाजांनी पूर्ण केलेल्या धावा
World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी
जर या नियमांवर लक्ष दिलं तर गप्टिलने चेंडू थ्रो करेपर्यंत स्टोक्स आणि राशिदने पहिली धाव पूर्ण केली होती. पण दुसऱ्या धावेसाठी एकमेकांना ओलांडलं नव्हतं. त्यामुळे इंग्लंडला केवळ 5 धावा द्यायला हव्या होत्या.
सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंड विजयी
न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्याती सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement