सामना तर जिंकलाच पण पोरींनी मनंही जिंकली; टीम इंडियाचं पाकिस्तानी खेळाडूच्या बाळासोबत सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
ICC Women World Cup 2022: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काल पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाना पाकिस्तानच्या महिला संघाचा पराभव केला. एका वेगळ्या कारणासाठी टीम इंडियाच्या लेकींचं विशेष कौतुक होतंय.
ICC Women World Cup 2022: न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काल पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाना पाकिस्तानच्या महिला संघाचा पराभव केला. भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 107 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 137 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचं कौतुक होतंय. मात्र एका वेगळ्या कारणासाठी टीम इंडियाच्या लेकींचं विशेष कौतुक होतंय. याचे व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
That's that from #INDvPAK game at #CWC22.
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022
Pakistan are bowled out for 137 in 43 overs.#TeamIndia WIN by 107 runs.
Scorecard - https://t.co/ilSub2ptIC #INDvPAK #CWC22 pic.twitter.com/jmP7xCPowi
टीम इंडियाच्या खेळाडू सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारुफच्या (Bismah Maroof) मुलीसोबत खेळत आहेत. बिस्माह आपल्या मुलीला घेऊन उभी आहे. तिच्याभोवती भारतीय खेळाडूंचा गराडा आहे. भारतीय खेळाडू तिच्यासोबत सेल्फी व्हिडीओ घेत असल्याचं दिसत आहे. या गोष्टीचं सोशल मीडियात जोरदार कौतुक होत आहे. आयसीसीनं देखील याबाबत ट्वीट करत कौतुक केलं आहे. यात म्हटलंय की, लहानग्या फातिमाचा भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटच्या स्पिरीट पहिला धडा घेतला आहे, असं आयसीसीनं म्हटलंय.
Little Fatima's first lesson in the spirit of cricket from India and Pakistan 💙💚 #CWC22
— ICC (@ICC) March 6, 2022
📸 @TheRealPCB pic.twitter.com/ut2lCrGL1H
पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफ आपल्या 6 महिन्याच्या मुलीसह विश्वचषक खेळण्यासाठी आली आहे. काल बिस्माह माउंट माँगानुई येथे पोहचली तेव्हा तिच्या हातात सहा महिन्याची मुलगी होती. आयसीसीने (ICC) आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावर बिस्माहचा फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ती आपल्या मुलीसोबत दिसत आहे. या फोटोवर देखील नेटकऱ्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने तर 2022 मधील सर्वोत्कृष्ट फोटो असे म्हटले आहे. बिस्माह हिने ऑगस्ट 2021 मध्ये मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संघात पुनरागमन केलं आहे.
🏏 Cricket kit
— ICC (@ICC) March 6, 2022
🧳 Bags packed
👶 Baby cradle
Pakistan captain Bismah Maroof ready to face India 😁#CWC22 pic.twitter.com/1ntYZfCzPY
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha