ICC Women's World Cup 2022 : हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचा 62 धावांनी पराभव
ICC Women's World Cup 2022 : पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) पराभव करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
ICC Women's World Cup 2022 : ICC महिला विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) पराभव करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. महिला विश्वचषक 2022 च्या आठव्या लीग सामन्यात, न्यूझीलंडने (New zeland) भारताचा 62 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. न्यूझीलंडचा तीन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. त्याचबरोबर भारताचा दोन सामन्यातील हा पहिलाच पराभव आहे. मोठ्या नुकसानीमुळे भारताचा निव्वळ धावगतीही खालावली आहे. आतापर्यंत भारताचा नेट रन रेट 2 पेक्षा जास्त होता, मात्र या सामन्यानंतर तो खाली आला आहे.
हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचा 62 धावांनी पराभव
सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात चांगली झाली, परंतु न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन आणि एमिलिया केर यांनी संघाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर केरने एमी सथर्टवेटसोबत भागीदारी केली. न्यूझीलंड संघाने निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 260 धावा केल्या. व्हाईट फर्न्सतर्फे एमी सथर्टवेटने 75 धावा केल्या, तर एमिलिया केरने 50 धावा केल्या. केटी मार्टिनने 41 आणि सोफी डिव्हाईनने 35 धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने 4, राजेश्वरी गायकवाडने 2 आणि झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संघ विजयी रेषेपासून लांब
दुसरीकडे, 261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. मिताली राज, यस्तिका भाटिया आणि शेवटी हरमनप्रीत कौर यांनी आशा दाखवल्या असल्या तरी संघ विजयी रेषेपासून लांब दिसत होता. भारताकडून हरमनप्रीत कौरने 63 चेंडूत 71 धावांची खेळी केली, तर कर्णधार मिताली राज 31 धावांवर बाद झाली. यास्तिकाने 28 आणि स्नेह राणाने 18 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ली ताहुहू आणि एमिलिया केर यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. हिली जेन्सनला दोन, जेस केर आणि हॅना रोवेला प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताचा संघ 46.4 षटकांत 198 धावांत आटोपला.
हे देखील वाचा-
- Sreesanth Retirement: तो पुन्हा परतणारचं नाही, एस. श्रीशांतचा मोठा निर्णय
- Happy Birthday Parthiv Patel : 17 वर्षाचा असताना डेब्यू करणारा भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलचा वाढदिवस, इतके वर्षे खेळूनही शतकापासून पार्थिव दूरच
- ICC Test Rankings : रवींद्र जाडेजा कसोटीमधील अव्वल अष्टपैलू