एक्स्प्लोर

ICC T20 World Cup 2021 : T20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' तारखेला दुबईत होणार सामना

ICC T20 World Cup 2021: क्रिकेट चाहत्यांसाठी भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे आनंदाची पर्वणी असतो. आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहे

ICC T20 World Cup 2021: क्रिकेट चाहत्यांसाठी भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे आनंदाची पर्वणी असतो. आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे.  भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडल्यामुळं दोन देशांतील क्रिकेट सामन्यांच्या मालिका कित्येक वर्षापासून खेळल्या गेलेल्या नाहीत.  

टी20 वर्ल्ड कपची सुरुवात यावर्षी 17 ऑक्टोबरपासून UAE मध्ये होणार आहे. या विश्वचषकात सर्वांचं लक्ष भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेटचे चाहते या सामन्याची वाट पाहून आहेत.  दोन वर्षांपूर्वी आयसीसीच्या वन डे विश्वचषकात याच दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना रंगला होता. आणि आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. 

ICC T20 World Cup 2021 Groups : आयसीसीकडून टी-20 वर्ल्डकपमधील ग्रुपची घोषणा; भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

आयसीसीकडून टी20 विश्वचषकाची गटवारी जाहीर

आयसीसीने टी20 विश्वचषकाची गटवारी नुकतीच जाहीर केली. यात भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. ब गटातल्या या संघांमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसह पात्रता फेरीतल्या दोन संघांचा समावेश असणार आहे. तर अ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतून येणारे दोन संघ असतील. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे.

IND vs PAK : फिरसे एक बार.... मौका मौका

विश्वचषकात टीम इंडियाच सरस

ट्वेन्टी ट्वेन्टी असो किंवा वन डे विश्वचषक. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावरच्या या महासंग्रात नेहमीच टीम इंडियानं वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आजवर भारत आणि पाकिस्तान संघात पाच लढती झाल्या आहेत. त्या पाचही लढतीत भारतीय संघ वरचढ ठरला आहे. 2007 च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने पाकिस्तानचाच पराभव करत अजिंक्यपद पटकावले होते. 1992 पासून वन डे विश्वचषकतही भारताने विजयाची परंपरा 2019 च्या इंग्लंडमधल्या विश्वचषकापर्यंत कायम राखली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवण्याचा 'मौका' टीम इंडियाला मिळणार आहे.

स्पर्धा परदेशात पण, यजमान भारतच!

खरंतर यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक भारतात होणार होता. पण भारतातल्या कोरोना परिस्थितीमुळे बीसीसीआयने स्पर्धा परदेशात खेळवण्याचा निर्णय घेतला.  संयुक्त अरब अमिरात आणि  ओमान या दोन देशातल्या चार शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. पण स्पर्धा देशाबाहेर असली तरी यजमानपद मात्र भारताकडेच राहणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget