Ind vs Eng, Match Highlights : भारताची इंग्लंडवर सात विकेटने मात, ईशान किशन आणि राहुलची अर्धशतकी खेळी
ICC T20 WC 2021, Ind vs Eng: टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फेरीला सुरुवात होण्यापूर्वी भारताने सराव सामन्यात इंग्लंडवर 7 विकेटनी मात केली आहे.
IND vs ENG Match : आयपीएल (IPL) संपलं असून आता टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु झाला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फेरीला सुरुवात होण्यापूर्वी भारताने सराव सामन्यात इंग्लंडवर 7 विकेटनी मात केली आहे. आयसीसी अकादमीच्या मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लडने भारताला 20 षटकात 189 धावांचे आव्हान दिले होते. भारताने तीन विकेट गमात 19 षटकात 189 धावा करत इंग्लंडवर मात केली. भारताकडून ईशान किशनने सर्वात चांगली कामगिरी केली. ईशाननंतर भारताकडून राहुलने अर्धशतकी खेळी केली आहे. ईशान आणि राहुलने दिलेल्या योगदानामुळे भारताला हा विजय मिळवून दिला आहे.
भारताकडून आज रोहित शर्माने डावाची सुरुवात केली आहे. कर्णधार कोहलीने ईशान किशन आणि केएल राहुलने ओपनिंग करण्याची संधी दिली. राहुलने सहा षटकार आणि तीन चौकारासह 51 धावा केल्या. तर ईशान किशनने सात चौकार आणि तीन षटकारासह 70 धावा केल्या आहेत.
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव फ्लॉप
भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही खास कामगिरी केली नाही. कोहली 11 धावा करत तंबूत परतला. सूर्यकुमार यादवला देखील काही खास कामगिरी करता आली नाही. यादवने 8 धावा केल्या.
सुपर 12 सामने :
- 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता
- 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध B1 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता
06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध A2 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता
सेमीफायनल्स आणि फायनलचा कार्यक्रम
- 10 नोव्हेंबर : पहिली सेमीफायनल
- 11 नोव्हेंबर : दुसरी सेमीफायनल
- 14 नोव्हेंबर : फायनल
- 15 नोव्हेंबर : फायनलसाठी रिझर्व्ह डे
दरम्यान, टीम इंडिया या स्पर्धेची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून करणार आहे. या स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार आहे.