एक्स्प्लोर
Advertisement
आयसीसी रँकिंगमध्ये भारताचं अव्वल स्थान आणखी मजबूत
आयसीसीच्या या नव्या क्रमवारीत 2014-15 सालची कामगिरी विचारात घेण्यात आलेली नाही.
मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने आयसीसीच्या सुधारित कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे.
आयसीसीच्या या नव्या क्रमवारीत 2014-15 सालची कामगिरी विचारात घेण्यात आलेली नाही. त्याऐवजी 2015-16 आणि 2016-17 या दोन वर्षांमधल्या कामगिरीला पन्नास टक्के महत्त्व देण्यात आलं आहे.
त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या क्रमांकाच्या दक्षिण आफ्रिका संघावरची आघाडी चारवरुन तेरावर नेली आहे.
टीम इंडियाच्या खात्यात आता सर्वाधिक 125 गुणांची नोंद असून, दक्षिण आफ्रिका 112 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरच्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 106 गुण आहेत.
चार गुणांची वाढ घेत ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, तर न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात 102 गुण जमा आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement