एक्स्प्लोर

World Cup 2019 : अंपायरशी हुज्जत पडली महागात, विराट कोहलीला दंड

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला. अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी करत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत दिली. मात्र भारतीय गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने हा विजय ओढून आणला.

लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला. अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी करत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत दिली. मात्र भारतीय गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने हा विजय ओढून आणला. भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय ठरला. भारताने अफगाणिस्तानसमोर 225 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नाबीने एकाकी झुंज दिली. नाबीने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. परंतु भारतीय गोलंदाजांनी नाबीव्यतिरिक्त कोणत्याही अफगाणी खेळाडूला फार वेळ मैदानावर उभे राहू दिले नाही. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे भारताने हा सामना खिशात घातला. दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या आक्रमक वृत्तीचा चांगलाच फटका बसला. अफगाणिस्तानच्या डावात जसप्रीत बुमराहचा चेंडू फलंदाज रहमत शाहच्या पॅडवर आदळला. त्यावेळी बुमराह आणि कोहलीने पायचीतचे जोरदार अपील केले. परंतु पंच अलीम डार यांनी फलंदाज नाबाद असल्याचा कौल दिला. यावेळी कर्णधार विराटने अतिशय आक्रमकपणे केलेल्या अपिलवर पंचांनी हरकत घेतली. विराटच्या आक्रमक अपिलनंतरही डार त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. दरम्यान विराट अपिल करतच राहिला. त्यामुळे आयसीसीच्या आचारसंहिता नियमाचा भंग केल्याप्रकरणी विराटला त्याच्या मानधनाच्या पंचवीस टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला.  विश्वचषकासाठी विराटच्या किटमध्ये तीन नवीन बॅट्स | खेळ माझा | ABP Majha  मधल्या फळीतील खेळाडुंच्या संथ खेळीवर सचिन तेंडुलकरची नाराजी भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याने भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात मधल्या फळीतील भारतीय फलंदाजांच्या संथ खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सचिन म्हणाला की, मधल्या फळीत एम. एस. धोनी आणि केदार जाधवमध्ये चांगली भागिदारी पाहायला मिळाली खरी, परंतु दोघांनी खूपच संथ धावा केल्या. तर भारतीय फलंदाजांनी अफगाणी स्पिनर्सना डोक्यावर बसवल्याचा आरोप माजी क्रिकेटर के. श्रीकांत यांनी केला आहे. धोनीने या सामन्यात अवघ्या 53.85 च्या स्ट्राईक रेटने 52 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने 28 धावा केल्या. तर केदार जाधवने 3 चौकार आणि एका षटकारासह 68 चेंडूत 52 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने मात्र चांगली फलंदाजी केली. विराटने 63 चेंडूत 67 धावा केल्या. विराट आणि केदारच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अफागाणिस्तानसमोर 225 धावांचे आव्हान उभे केले. अखेर भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला. World Cup 2019 : अंपायरशी हुज्जत पडली महागात, विराट कोहलीला दंड Getty Images
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
Embed widget