एक्स्प्लोर
आशिया चषक विजेत्या महिला खेळाडूंना केवळ 1-1 लाखाचं इनाम
आशिया चषक हॉकी विजेत्या भारतीय महिला संघातल्या प्रत्येक खेळाडूला, हॉकी इंडियाच्यावतीनं एक लाख रुपयांचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई: आशिया चषक हॉकी विजेत्या भारतीय महिला संघातल्या प्रत्येक खेळाडूला, हॉकी इंडियाच्यावतीनं एक लाख रुपयांचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे.
या संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंगनाही एक लाख रुपयांचं, तर सपोर्ट स्टाफ प्रत्येकी पन्नास हजार रुपये देऊन गौरवण्यात येईल.
भारतीय महिला हॉकीपटूंनी आशिया चषकात मिळवलेलं यश ही तर केवळ सुरुवात आहे. या संघानं आता आपलं लक्ष आणखी मोठ्या कामगिरीवर केंद्रित केलं असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स, इंडोनेशियात होणारं एशियाड आणि इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक ही पुढील वर्षी भारताच्या महिला संघासमोरची मोठी आव्हानं आहेत. या तीनपैकी किमान दोन स्पर्धांमध्ये भारताला पदकाची आशा असल्याचा विश्वास हरेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आशिया चषक हॉकीतल्या कामगिरीनं भारतीय महिलांना जागतिक क्रमवारीत दहावं स्थान मिळवून दिलं आहे.
आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकत भारतीय महिला संघांनं चीनला नमवलं!
https://twitter.com/TheHockeyIndia/status/927200478114410496
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement