मुख्यपृष्ठक्रीडाहिमा दासने मिल्खा सिंग आणि पीटी उषाचाही विक्रम मोडला
हिमा दासने मिल्खा सिंग आणि पीटी उषाचाही विक्रम मोडला
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 13 Jul 2018 07:37 PM (IST)
1/6
हिमा व्यतिरिक्त ज्युनियर जागतिक चॅम्पियनशीपमध्ये सीमा पुनियाने 2002 साली डिस्कस थ्रोमध्ये कांस्य आणि नवदीप कौर ढिल्लनने 2014 मध्ये डिस्कस थ्रो मध्येच कांस्य पदकावर नाव कोरलं होतं.
2/6
हिमा दासने मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचाही विक्रम मोडला. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग चौथ्या क्रमांकावर होते, तर पीटी उषा 1984 सालच्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर होत्या.
3/6
हिमा दास जागतिक स्तरावर सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला अॅथलिट ठरली आहे.
4/6
हिमा दासपूर्वी या स्पर्धेत एकाही भारतीय अॅथलिटने सुवर्ण पदक जिंकलेलं नाही.
5/6
18 वर्षीय हिमा दासने हा विक्रम केवळ 51.46 सेकंदांमध्ये पूर्ण केला.
6/6
भारताची धावपटू हिमा दासने वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला.