एक्स्प्लोर

हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता, वीरेंद्र सहवागनं निवडला टी20 विश्वचषकासाठी संघ

Virender Sehwag Plying XI For T20 WC : 9 जून रोजी टीम इंडिया पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत (IND vs PAK) भिडणार आहे. टी 20 विश्वचषकात टीम इंडिया कोणत्या प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार?

Virender Sehwag Plying XI For T20 WC : आयपीएलच्या (IPL 2024) रनसंग्रामानंतर टी20 विश्वचषकाचा ( T20 World Cup)महासंग्राम सुरु होणार आहे. दोन जून 2024 पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषकाचा ( T20 World Cup) थरार रंगणार आहे. भारतीय संघ विश्वचषकाचं अभियान पाच जून रोजी आयर्लंडविरोधात सुरु करणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी टीम इंडिया पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत (IND vs PAK) भिडणार आहे. टी 20 विश्वचषकात टीम इंडिया कोणत्या प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार? कोण कोणत्या खेळाडूंना संघात स्थान मिळणार? याबातच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चा सुरु असतानाच भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग यानं टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली आहे. 

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर लवकरच विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करणार आहेत. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी कऱणाऱ्यांना संघात स्थान दिलं जाईल, असं अजित आगरकर यांनी आधीच हिंट दिली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्यांकडे भारतीय चाहत्यांच्या नजरा आहेतच. वीरेंद्र सहवाग यांनी प्लेईंग 11 ची निवड केली आहे. सहवागने निवडलेल्या संघात हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनला स्थान मिळालं नाही.

 वीरेंद्र सहवागच्या संघात कोण कोण ?

भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सहवागनं टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली आहे. सहवागने आपल्या प्लेईंग 11 मध्ये हार्दिक पांड्याला स्थान दिले नाही. त्याशिवाय संजू सॅमसन आणि चहल यांनाही स्थान दिलेले नाही. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांना सलामीसाठी निवडलं आहे. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यासारख्या फलंदाजांना स्थान दिलेय. त्याशिवाय  रिंकू सिंह अथवा शिवम दुबे यांच्यापैकी एकाला स्थान देण्याबात सहवागनं सांगितलं आहे. वीरेंद्र सहवागच्या संघात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यालाही स्थान मिळालेय. पण हार्दिक पांड्याचा पत्ता कट झालाय. 

सहवागने कोणत्या गोलंदाजांवर विश्वास दाखवला 

वीरेंद्र सहवागने आपल्या प्लेईंग 11 मध्ये कुलदीप यादव हा एकमेव स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज ठेवलाय. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. बुमराहच्या जोडीला मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा यांना स्थान दिले आहे. दरम्यान, यंदाचा विश्वचषकात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील मैदानात पार पडणार आहे. दोन जून पासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. सध्या जगभरातील बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली जाणार आहे.

वीरेंद्र सहवागनं निवडलेली प्लेईंग 11 -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह/शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा

Virender Sehwag’s Predicted Squad:
Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Virat Kohli, Suryakumar Yadav, Rishabh Pant, Rinku Singh/Shivam Dube, Ravindra Jadeja, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Md. Siraj, Sandeep Sharma. (He revealed his squad on Club Prairie fire YT)

आणखी वाचा :

RCB साठी नियम वेगळे आहेत का? चेन्नई-लखनौ सामन्यादरम्यानच्या 'नो बॉल'वर आता वाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget