
राज्यसभेत पाऊल ठेवताच हरभजनचा षटकार, सगळा पगार शेतकऱ्यांच्या लेकींना!
Harbhajan Singh : माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने शनिवार मोठी घोषणा केली आहे.

Harbhajan Singh : माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने शनिवार मोठी घोषणा केली आहे. राज्यसभेचा सर्व पगार शेतकऱ्याच्या लेकीच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याची घोषणा हरभजन सिंह याने केली आहे. हरभजन सिंह याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. भज्जीच्या या निर्णायानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भज्जीच्या निर्णायचं स्वागत करण्यात आले आहे.
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. नुकतीच भज्जीने खासदार म्हणून शपथ घेतली. त्यानंतर कामकाज सुरु केल्यानंतर हरभजन सिंह याने मोठं पाऊल उचललं आहे.
हरभजन सिंह याने शनिवारी ट्विट करत घोषणा केली. ट्विटमध्ये भज्जी म्हणाला की, 'एक राज्यसभा सदस्यच्या रुपाने माझा सर्व पगार शेतकऱ्यांच्या मुली आणि सामाजिक कार्यासाठी देणार आहे. देशाला आणखी उत्तम आणि कणखर करण्यात योगदान देऊ इश्चितो. त्यासाठी मी सर्वकाही करण्यास तयार आहे.'
पाहा भज्जीचे ट्विट
As a Rajya Sabha member, I want to contribute my RS salary to the daughters of farmers for their education & welfare. I've joined to contribute to the betterment of our nation and will do everything I can. Jai Hind 🇮🇳🇮🇳
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 16, 2022
हरभजन सिंह नुकताच आप पक्षाकडून राज्यसभा खासदार झाला. आपनं (AAP) या जागांवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh), आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक (Sandeep Pathak), पंजाबचे आपचे सह-प्रभारी राघव चढ्ढा (Raghav Chadha), लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल (Ashok Mittal) आणि कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
