एक्स्प्लोर
झिम्बाब्वेतल्या टी-20 मालिकेत भारताचा विजय, केदार जाधवची मॅचविनिंग खेळी
हरारेः धोनीच्या टीम इंडियानं हरारेच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात झिम्बाब्वेला तीन धावांनी हरवलं आणि मालिकेत 2-1 असा विजय साजरा केला. पण या विजयासाठीही धोनी ब्रिगेडला घाम गाळावा लागला. अखेरच्या चेंडूपर्यंत झिम्बाब्वेनं टीम इंडियाला झुंजवलं.
या सामन्यात भारतानं दिलेल्या 139 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेनं 19 षटकांत 118 धावांची मजल मारली. झिम्बाब्वेला विजयासाठी अखेरच्या षटकांत 21 धावांची गरज होती. बरिंदर सरननं टाकलेल्या त्या षटकात झिम्बाब्वेनं पहिल्या पाच चेंडूंमध्ये 17 धावा ठोकल्या. मात्र शेवटच्या षटकात भारताने रोमहर्षक विजय साजरा केला.
भारतानं झिम्बाब्वेला 138 धावांच आव्हान दिलं होतं. पण झिम्बाब्वेला 20 षटकांत 135 धावाच करता आल्या. धवल कुलकर्णीनं दोन तर बरिंदर सरन, अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी एक विकेट काढून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.
प्रथम फलंदाजी करताना केदार जाधवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 6 बाद 138 धावांची मजल मारली होती. केदारनं 42 चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह 58 धावांची खेळी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement