एक्स्प्लोर

Sports News : लाडू भरवून केला ऐतिहासिक विक्रम साजरा; भारताचा सर्वात वेगवान धावपटू गुरिंदरवीर सिंगची आलिया भट्टने घेतली पहिली मुलाखत!

Gurindervir Singh Interview with Alia Bhatt: 10.09 सेकंदांचा ऐतिहासिक वेळ नोंदवून भारताचा सर्वात वेगवान धावपटू ठरलेल्या गुरिंदरवीर सिंगची 'अल्फा' चित्रपटाची अभिनेत्री आलिया भट्टने खास मुलाखत घेतली. 

मुंबई : यश राज फिल्म्सच्या (YRF) बहुप्रतीक्षित आणि हाय-व्होल्टेज ‘अल्फा’ (Alpha) चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशातच, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने भारताचा नवा ट्रॅक सुपरस्टार गुरिंदरवीर सिंग (Gurindervir Singh) याच्याशी एक खास आणि भावनिक संवाद साधला आहे. नुकताच ट्रॅकवर अवघ्या 10.09 सेकंदांचा विक्रमी वेळ नोंदवत इतिहास रचणारा गुरिंदरवीर सध्या भारताचा सर्वात वेगवान धावपटू ठरला आहे.

या ऐतिहासिक कामगिरीनंतर गुरिंदरवीरने पहिली मुलाखत आलिया भट्टला दिली असून, हा आनंद लाडू भरवून साजरा करण्यात आला. या मनमोकळ्या संवादात त्याने खेळ सोडण्याच्या कठीण काळापासून ते यशाच्या शिखरापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडला.

वडिलांचे अपूर्ण स्वप्न बनले प्रेरणा

संवादाची धमाकेदार सुरुवात करत गुरिंदरवीर म्हणाला, “सगळ्यांच्या पुढे आणि सर्वात वेगवान होण्यासाठी फोकस, जिद्द आणि हार्ड वर्क लागतो. रेडी?” यावर आलियाने त्याचे कौतुक करत विचारले की, "तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला भारतातील सर्वात वेगवान धावपटू बनायचं आहे?"

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत गुरिंदरवीरने सांगितले की, "लहानपणी मी वडिलांच्या ट्रॉफीज आणि मेडल्स नेहमी स्वच्छ करायचो. त्यांचा व्हॉलीबॉल खेळतानाचा एक फोटो पाहून मीही देशासाठी काहीतरी करायचं ठरवलं. नंतर उसैन बोल्टचा वर्ल्ड रेकॉर्ड पाहिला आणि एथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला."

तो पुढे म्हणाला की, "वडिलांना दुखापत झाल्यामुळे खेळ सोडावा लागला होता. तेच त्यांचं स्वप्न नंतर माझं स्वप्न बनलं. रेस जिंकल्यानंतर मी सर्वात आधी त्यांनाच फोन करून विचार, ‘डॅडी, आता कसं वाटतंय? त्यावर ते म्हणाले, खूप मजा आली. माझ्या वडिलांनी स्वतःसाठी कधीच काही घेतलं नाही. कामावरून आल्यानंतर ते माझ्यासाठी जेवण बनवायचे. माझे पहिले महागडे स्पाइक्स (धावण्याचे शूज) त्यांनी न्यूझीलंडमधून आणले होते."

जेव्हा आईने दिला कठीण काळात धीर

प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक कठीण काळ येतो, तसाच तो गुरिंदरवीरच्या आयुष्यातही आला होता. २०२४ मधील त्या प्रसंगाबद्दल सांगताना तो म्हणाला की, "अशी वेळ आली होती की मी पूर्णपणे खचलो होतो. मी वडिलांना म्हणालो की कदाचित आता माझ्याकडून हे शक्य होणार नाही. वडिलांनीही मला घरी परत येण्यास सांगितले. पण, त्यावेळी माझ्या आईने आम्हा दोघांना धीर दिला. तिने सांगितले की देवावर विश्वास ठेवा, हा कठीण काळही निघून जाईल. तिच्या याच शब्दांमुळे मी पुन्हा ट्रॅकवर धावू शकलो."

धावपट्टीचा खरा 'अल्फा' ठरलेल्या गुरिंदरवीरचा हा प्रवास देशातील हजारो तरुण खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Vaibhav Sooryavanshi : रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
PM Modi Praised Vaibhav Sooryavanshi : न बोलताही बरंच काही सांगून गेले PM मोदी! 15 वर्षांचा वैभव खळखळून हसला, नेमकं काय घडलं? पाहा 26 सेकंदाचा व्हिडिओ
न बोलताही बरंच काही सांगून गेले PM मोदी! 15 वर्षांचा वैभव खळखळून हसला, नेमकं काय घडलं? पाहा 26 सेकंदाचा व्हिडिओ
Mumbai Squad Ranji Trophy Match : टीम इंडियात कमबॅक करायचंय, पण मुंबईतच नो एन्ट्री! सूर्यकुमार यादवला पुन्हा नाकारलं, पाहा 16 जणांचा चक्रावून टाकणार Squad
टीम इंडियात कमबॅक करायचंय, पण मुंबईतच नो एन्ट्री! सूर्यकुमार यादवला पुन्हा नाकारलं, पाहा 16 जणांचा चक्रावून टाकणार Squad

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Amravati : महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
Nanded Accident News: पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
Vaibhav Sooryavanshi : रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
Embed widget