एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Eetha: प्रसूतीत वेदनेनं विव्हळत होती 'ईठा', पण तरीही.. अंगावर काटा आणणारा टीझर पाहून लेकीची भावुक पोस्ट

Shraddha Kapoor Eetha Movie: 'ईठा' सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर ज्येष्ठ तमाशा कलाकार मंगला बनसोडे यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर केली आहे.

Shraddha Kapoor Eetha: 'स्त्री 2' (Stree 2) हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकवर्ग अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान आता, 'ईठा' सिनेमाचा टीझर सोशल मीडियात लीक झाल्यानंतर हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. काही तासांपूर्वी  'ईठा' (Eetha) सिनेमाचा बहुचर्चित टीझर  रिलीज झाला असून, प्रेक्षकांनी श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं तोंडभरुन कौतुक केलंय. 'ईठा' या सिनेमातून श्रद्धा कपूरचा कधी न पाहिलेला लूक  पाहायला मिळत आहे. 'कॉकटेल 2' (Cocktail 2) सिनेमा प्रदर्शनाआधी  'ईठा' सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझर  लीक झाल्यानंतर अखेर आज  मॅडॉक फिल्म्सने या सिनेमाचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज केलाय. 

'ईठा'  सिनेमाचा टीझर स्व. विठाबाईंच्या लेकीकडून सोशल मीडियात शेअर (Vithabai Narayangaonkar Eetha Movie Teaser)

'ईठा' या सिनेमातून तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांचे जीवनप्रवास दाखवण्यात आले आहे.  विठाबाईंनी आपल्या आयुष्यात बरेच चढ उतार पाहिले आहेत. त्यांचा खडतर जीवनप्रवास 'ईठा' या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.  अंगावर काटा आणणाऱ्या या टीझरमध्ये (Entertainment) 'ईठा'अर्थात श्रद्धा कपूर प्रसूती वेदनेत विव्हळत असते. मंचावरील सादरीकरण अर्ध्यावर सोडून त्या बाळाला जन्म देतात. नंतर त्याच अवस्थेत मंचावर जाऊन  लावणी सादर करतात. यातून त्यांचं कलेवर असलेलं प्रेम दिसून येते. हा सीन अंगावर काटा आणणारा आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सौ.मंगला बनसोडै (@mangala_bansode_official)

'ईठा' सिनेमाचा टीझर व्हायरल होताच प्रेक्षकांनी श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलंय. दरम्यान, स्व. विठाबाई नारायणगावकर यांची कन्या आणि ज्येष्ठ तमाशा कलाकार  मंगला बनसोडे यांनीही  'ईठा' सिनेमाचा टीझर सोशल मीडियात शेअर केला आहे. तसेच पोस्टला भावनिक कॅप्शनही दिलंय. 'माझ्या आईच्या जीवनावर आधारित भव्य बॉलीवूड चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे! आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की, हा टीझर नक्की पाहावा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा'.

'एका आईच्या संघर्ष, त्याग आणि प्रेरणादायी प्रवासाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. आपला एक शेअर आणि एक प्रतिसाद या सुंदर कलाकृतीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. संपूर्ण चित्रपटाच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करो, हीच सदिच्छा', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या  सिनेमाला संगीत अजय - अतुल यांनी दिले असून, या चित्रपटाच्या संपूर्ण अल्बमच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसूती कळा, नाळ ठेचली अन् त्याच जोमात मंचावर उभी राहिली, 'ईठा'चा अंगावर काटा आणणारा टीझर; श्रद्धा कपूरसह कोण झळकणार?

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Climax: 'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
Kajalkath Yamini Dalvi: एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान
एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान
Rakhi Sawant on Kangana Ranaut: 'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
Director Death in Hotel: हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?
हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Embed widget