एक्स्प्लोर

Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?

Devdutt Padikkal Century News : श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने वादळी शतक ठोकले.

Devdutt Padikkal Century News : श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने वादळी शतक ठोकले, यासोबत पहिल्या कसोटीच्या प्लेइंग-11साठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. कोलंबोमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पडिक्कलने अवघ्या 121 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. मात्र, शतक झळकावल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.

पडिक्कलची वादळी शतकी खेळी (Devdutt Padikkal Century Ind vs Sl)

सराव सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाला आपल्या फलंदाजांचा फॉर्म आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची बघायची होती. त्यामुळे सर्व प्रमुख फलंदाजांना संधी दिली जात आहे. या संधीचं सोनं करत पडिक्कलने शानदार फलंदाजी केली. पडिक्कलने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने फलंदाजी केली. त्याने 61 चेंडूंमध्ये 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याचा आक्रमक अंदाज कायम राहिला. चौकारांचा पाऊस पाडत त्याने फक्त 121 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे पडिक्कलने चौकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या खेळीत एकूण 14 चौकारांचा समावेश होता. शतक पूर्ण झाल्यानंतर मात्र त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं. त्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी क्रीजवर आला.

तिसऱ्या क्रमांकासाठी पडिक्कलची दावेदारी मजबूत (Devdutt Padikkal Century Ind vs Sl)

पडिक्कलच्या या शतकामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये तिसऱ्या क्रमांकासाठीची स्पर्धा अधिक रंगली आहे. विशेषतः साई सुदर्शनच्या फिटनेसचा प्रश्न कायम असताना पडिक्कलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आहे. साई सुदर्शन हा भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकासाठी महत्त्वाचा पर्याय मानला जातो. मात्र, सध्या तो पूर्णपणे फिट नसून सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये रिहॅबिलिटेशनमधून जात आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत पडिक्कलने श्रीलंका इलेव्हनविरुद्ध थेट शतक झळकावल्याने टीम मॅनेजमेंटसमोर एक मजबूत पर्याय उभा राहिला आहे.

सराव सामन्यातील पडिक्कलची खेळी ठरू शकते निर्णायक (Devdutt Padikkal Century Ind vs Sl) 

श्रीलंका इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर 90 षटकांत 8 विकेट गमावत 363 धावा केल्या. श्रीलंका इलेव्हनकडून निशान मदुशंकाने 65 चेंडूंमध्ये 66 धावांची खेळी केली. रविंद्र रासांथाने 143 चेंडूंमध्ये 71 धावा केल्या, तर कर्णधार सोनल दिनूषाने 52 धावा केल्या. पसिंदू सूर्यबांदारा यानेही 63 चेंडूंमध्ये 35 धावांचं योगदान दिलं. श्रीलंका इलेव्हनच्या डावात अजून दोन विकेट शिल्लक असताना घोषित केला. मात्र, भारताची सुरुवात धक्कादायक झाली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जायस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर पडिक्कलने डाव सावरला आणि केएल राहुलसोबत महत्त्वाची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर उतरून शतक झळकावत त्याने दबावाच्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध केलं. 

हे ही वाचा -

IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
Team India Injury Crisis : टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget