Gautam Gambhir on Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची कॅप्टन इनिंग अन् गौतम गंभीरला वर्ल्डकपची आठवण; दिला लाखमोलाचा सल्ला!
Gautam Gambhir on Suryakumar Yadav : कॅप्टन सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात केलेल्या अर्धशतकी खेळीवर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.
Gautam Gambhir on Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौर्याची सुरुवात (Indian cricket team Tour of South Africa) खराब झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20I पावसाने वाहून गेला. दुसऱ्या सामन्यही पावसाने घोळ घातल्याने दुसरा T20 सामना पाच गडी राखून गमावला. ही T20I मालिका भारत पुढील वर्षी जूनमध्ये 2024 T20 विश्वचषकापूर्वी खेळणार असलेल्या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी एक आहे. आतापासून, BCCI निवड आणि निवड समितीकडे संघ निवडण्यासाठी आणखी फक्त चार T20I आणि IPL सामने आहेत. तथापि, भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T20I साठी केलेल्या काही निवडीने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
सूर्याने वनडेमधील दृष्टीकोन टी-20 पद्धतीने ठेवला पाहिजे
दुसरीकडे, कॅप्टन सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या अर्धशतकी खेळीवर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. सूर्यकुमार यादवला अशा पद्धतीची खेळी (दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अर्धशतकी खेळी) करण्यासाठी वनडे वर्ल्डकप संघात संघात होता. भविष्यात त्याला वनडे संघात स्थान मिळाल्यास सूर्याने वनडेमधील दृष्टीकोन टी-20 पद्धतीने ठेवला पाहिजे, असा सल्ला दिला.
Gautam Gambhir said, "Suryakumar Yadav was in the World Cup squad to play this kind of inning. In the future, if he gets more chances in the ODIs, he will need to approach ODIs like T20i". pic.twitter.com/tlazb6p79D
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 12, 2023
श्रेयस अय्यर का निवडले नाही?
दुसरीकडे, दुसऱ्या टी-20 सामन्यातील संघात करण्यात आलेल्या बदलाने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. गंभीर म्हणाला की, "मला माहित नाही (श्रेयस अय्यरला न निवडण्यामागे) कारण काय असू शकते. त्याने नुकतंच बंगळूरमधील शेवटच्या सामन्यात (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) अर्धशतक केले होते. ते डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजांकडे त्यांचा पसंती क्रम होता का? याचं फक्त टीम मॅनेजमेंटच उत्तर देऊ शकते. पहिल्या क्रमांकावर असलेला T20I गोलंदाज तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल तर तुमचा मुख्य संघ नाही. तुम्ही तरुणांना संधी देत आहेत. त्यामुळे फक्त सूर्यकुमार यादव आणि संघ व्यवस्थापन स्पष्टता देऊ शकतात,"
दक्षिण आफ्रिकेने 152 धावांच्या सुधारित लक्ष्याचा पाठलाग करताना मंगळवारी गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताचा पाच गडी राखून पराभव केला.
इतर महत्वाच्या बातम्या