KL Rahul on Jasprit Bumrah : केएल राहुल बुमराहला जे बोलला ते पाच मिनिटात खरं झालं! पण नेमकं म्हणाला तरी काय?
KL Rahul on Jasprit Bumrah : टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) त्याच्यासोबत आहे.
KL Rahul on Jasprit Bumrah : टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India Vs South Africa) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेची तयारी करताना दिसत आहे. यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) त्याच्यासोबत आहे. येथे केएल राहुल सहकारी खेळाडू बुमराहबद्दल (KL Rahul on Jasprit Bumrah) एक भविष्यवाणी करतो, जी 5 मिनिटांत अचूक ठरते. यानंतर केएल राहुलही खूप हसताना दिसत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये केएल राहुल ट्रेनिंगमध्ये घाम गाळताना दिसत आहे. तो सांगतो की, आज धावणे आणि फलंदाजीचे प्रशिक्षण आहे. यावेळी त्याला धावताना उलट्याही होतात. यानंतर केएल म्हणतो की, हे सर्व करूनही बुमराह नक्की म्हणेल की वेगवान गोलंदाजांचे जीवन अधिक कठीण आहे.
View this post on Instagram
यानंतर केएल बुमराहजवळ आला आणि बोलू लागला. दरम्यान, जेव्हा गोलंदाज आणि फलंदाजांच्या मेहनतीची चर्चा सुरू होते, तेव्हा बुमराह म्हणतो, 'तुझं बॅटचं काम सोपं आहे. बॅटच्या मागं लपणं सोपं आहे. बुमराह असे म्हणताच केएल म्हणतो, 'हे बघा, मी तुम्हाला जे सांगितले तेच बुमराह म्हणत आहे, असं तो म्हणाला की नाही?
View this post on Instagram
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये भिडणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी होणार आहे. या मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचा कर्णधार असेल.
इतर महत्वाच्या बातम्या