एक्स्प्लोर
FIFA : उरुग्वेचा 2-0 ने धुव्वा, फ्रान्सची उपांत्य फेरीत धडक
ग्रिझमनने 40 व्या मिनिटाला मारलेल्या फ्री किकवर, राफेल वरानने चेंडूला हेड करून गोलपोस्टची दिशा दिली. फ्रान्सचा दुसरा गोल अॅन्टॉईन ग्रिझमननेच झळकावला.

मॉस्को : फ्रान्सने उरुग्वेचा 2-0 असा धुव्वा उडवून, रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात अॅन्टॉईन ग्रिझमनने फ्रान्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश करणारा फ्रान्स पहिलाच संघ ठरला आहे. ग्रिझमनने 40 व्या मिनिटाला मारलेल्या फ्री किकवर, राफेल वरानने चेंडूला हेड करून गोलपोस्टची दिशा दिली. फ्रान्सचा दुसरा गोल अॅन्टॉईन ग्रिझमननेच झळकावला. त्याने गोलपोस्टच्या दिशेने धाडलेला चेंडू थोपवण्यात उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुसलेराने मोठी चूक केली. चेंडू त्याच्या हाताला लागून गोलपोस्टमध्ये जाऊन पडला आणि फ्रान्सचा दुसरा गोल साजरा झाला. फ्रान्सच्या विजयात कर्णधार आणि गोलरक्षक ह्युगो लॉरिसचं योगदान विसरता येणार नाही. त्याने मार्टिन कासेरेसची किक थोपवून उरुग्वेला बरोबरीची संधी मिळू दिली नाही.
आणखी वाचा























