(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA WC 2022: यंदा फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनासमोर सर्वात मोठं आव्हान कोणाचं? कॅप्टन Lionel Messi म्हणतो...
Lionel Messi on FIFA WC 2022: लिओनेल मेस्सी म्हणतो की, या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड, ब्राझील आणि फ्रान्सचे संघांचं अर्जेंटिनासमोर मोठं आव्हान असेल.
Lionel Messi on FIFA WC 2022: अर्जेंटिनाचा (Argentina) स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यंदा आपला पाचवा विश्वचषक (FIFA WC 2022) खेळणार आहे. बहुधा हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असेल. असं असेल तर, मेस्सीकडे त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्याची ही शेवटची संधी असेल. अशातच यंदा मेस्सीच्या संघासमोर तीन संघांचं आव्हान असेल, असं स्वतः मेस्सीनंच सांगितलं आहे.
अर्जेंटिनाना विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड, ब्राझील आणि फ्रान्स या संघांच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल, असं मेस्सीनं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण अमेरिकन फेडरेशन 'कॉन्मिबोल'शी संवाद साधताना मेस्सीनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तो म्हणाला की, "जेव्हाही आपण विश्वचषक स्पर्धेतील दावेदारांबद्दल बोलतो, तेव्हा त्याच-त्याच संघांची नावं समोर येतात. मला वाटतं यावेळी ब्राझील, इंग्लंड आणि फ्रान्स यांचं इतर संघांच्या तुलनेत आमच्यासमोर कडवं आव्हान असेल. पण ठामपणे काहीही सांगता येणार नाही, कारण ही स्पर्धा आणि स्पर्धेत काहीही होऊ शकतं."
2014 च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघानं अंतिम फेरीत धडक दिली होती. अर्जेंटिनाच्या यशामागे मेस्सीचं मोठं योगदान होतं. पण अंतिम सामन्यात जर्मनीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाला. त्यानंतर 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत नाक ऑउट मॅचेसमध्ये अर्जेंटिनाचा फ्रान्सकडून पराभव झाला होता. त्यानंतर अर्जेंटिनाचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं होतं.
🏆 #SelecciónMayor - Amistoso#DatoAlbiceleste 🇦🇷
— Selección Argentina 🇦🇷 (@Argentina) November 16, 2022
Lionel Messi llegó a los 9⃣1⃣ goles. ¡Que siga la magia, capitán! 💫
📝 https://t.co/5u5e1iMWf6 pic.twitter.com/ttWtNV1Sh7
अजिंक्य अर्जेंटिना...
सध्या लियोनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात खेळणारा अर्जेंटिनाचा संघ फॉर्मात आहे. हा संघ गेल्या 35 सामन्यांत अपराजित आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या लाडक्या संघाकडून खूप अपेक्षा आहेत. यंदा कतारमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ 'ग्रुप-सी'मध्ये आहे. याव्यतिरिक्त 'ग्रुप-सी'मध्ये सौदी अरेबिया, मेक्सिको आणि पोलंडसारखे संघ आहेत. प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ राऊंड ऑफ-16 च्या फेरीत पोहोचतील. त्यामुळे या ग्रुपमध्ये अर्जेंटिनासमोर मेक्सिको आणि पोलंडसारख्या दमदार संघांचं आव्हान असणार आहे.
फिफा वर्ल्डकपमधील ग्रुपसंदर्भात बोलताना मेस्सी म्हणाला की, "आम्ही खूप उत्साही आहोत. आमचा संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप-सीमध्ये आहे. वर्ल्डकपची सुरुवात धमाकेदार अंदाजात करण्यासाठी सज्ज आहोत. आमचं ध्येय वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावणं हेच आहे." दरम्यान, फिफा वर्ल्डकप 2022 मधील अर्जेंटिनाचा पहिला सामना 22 नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्ध असणार आहे.
अर्जेंटिनाचा संघ संपूर्ण संघ :
गोलकीपर्स : एमिलियानो मार्टिनेझ, फ्रँको अरमानी, जेरोनिमो रुल्ली
डिफेन्डर्स : गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, जर्मन पाजेला, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, लिसांड्रो मार्टिनेझ, जुआन फॉयथ, निकोलस टेग्लियाफिको, मार्कोस अकुना.
मिडफील्डर्स : लिएंड्रो परेदेझ, गुइडो रॉड्रिग्ज, एन्झो फर्नांडेझ, रॉड्रिगो डी पॉल, एक्सक्वेल पॅलासिओस, अलेजांद्रो गोमेझ, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर.
फॉरवर्ड्स : पाउलो डिबेला, लिओनेल मेस्सी, एंजल डी मारिया, निकोलस गोन्झालेझ, जोक्विन कोरिया, लॉटारो मार्टिनेझ, ज्युलियन अल्वारेझ.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Lionel Messi : 'होय हा माझा अखेरचा विश्वचषक असेल,' स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने स्वत:च सांगितलं