Fifa WC 2023 : कायलिन एम्बाप्पेनं मागे टाकलं रोनाल्डो-पेलेसारख्या दिग्गजांना, मेस्सीच्या रेकॉर्डशी केली बरोबरी
France vs Poland : फिफाच्या राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सनं पोलंडचा 3-1 नं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली, यावेळी स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेनं एक मोठा रेकॉर्ड नावे केला आहे.
Fifa World Cup 2023 : फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने पोलंडचा 3-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एमबाप्पेने (kylian mbappe) शानदार खेळ दाखवत दोन गोल केले. या दोन गोल्सच्या जोरावर कायलिननं महान फुटबॉलर पेले आणि रोनाल्डोसारख्या खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले. तर लिओनेल मेस्सीच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे.
एमबाप्पेने ब्राझीलचा महान खेळाडू पेलेचा विक्रम मोडला आहे. कारण वयाच्या 24 व्या वर्षी एमबाप्पेने फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम आपल्या नावावर करण्यासोबतच त्याने पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकलं आहे. रोनाल्डोने त्याच्या विश्वचषक कारकिर्दीत 20 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 8 गोल केले आहेत. दुसरीकडे, एमबाप्पेने त्याच्या विश्वचषक कारकिर्दीत केवळ 11 सामन्यांत 9 गोल करत रोनाल्डोला मागे टाकलं आहे.
मेस्सीशी केली बरोबरी
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या विशेष विक्रमाशी एमबाप्पेने बरोबरी केली आहे. एमबाप्पेच्या नावावर त्याच्या विश्वचषक कारकिर्दीत 9 गोल असून मेस्सीनेही वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 9 गोल केले आहेत. पण एमबाप्पे ज्या प्रकारच्या फॉर्मात आहे, ते पाहता तो लवकरच मेस्सीलाही मागे टाकू शकतो. कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये एमबाप्पेने आतापर्यंत 5 गोल केले आहेत.
प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यातही त्याने फ्रान्ससाठी दोन गोल केले. त्याच्या गोलच्या जोरावरच फ्रान्सने या सामन्यात पोलंडचा 3-1 असा पराभव केला.
फ्रान्सचा पोलंडवर विजय
सामन्यात फ्रान्सकडून एम्बाप्पेनं दोन गोल केले. तर पोलंडसाठी कर्णधार रॉबर्ट लेवनडॉस्कीनं अखेरच्या क्षणी गोल केला. पहिल्या हाफमध्ये रॉबर्ट लेवनडॉस्कीला गोल करता आला नाही. फ्रान्सकडून गिरूडनं 44व्या मिनिटाला पहिला गोल करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.यानंतर एमबाप्पेनं 74 व्या मिनिटाला फ्रान्ससाठी दुसरा गोल केला. पुन्हा एमबाप्पेनं गोल करून फ्रान्सच्या संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. क्वॉर्टर फायनल सामन्यात फ्रान्ससमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. हा सामना 10 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
हे देखील वाचा-
Fifa World Cup 2022 : आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार फिफा वर्ल्डकपचा थरार, वाचा सविस्तर