(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fifa World Cup 2022 : राऊंड ऑफ 16 मध्येही मोठा उलटफेर, पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा पराभव, मोरोक्को इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत दाखल
Fifa WC 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात दमदार संघ स्पेन पेनल्टी शूटआऊटमध्ये एकही गोल करु शकला नाही, ज्यामुळे मोरोक्कोने 3-0 ने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे.
Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) आज राऊंड ऑफ 16 च्या सामन्यांतही एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्पेनसारख्या दमदार संघाला चक्क पेनल्टी शूटआऊटमध्ये एकही गोल मारता आला नाही. ज्यामुळे मोरोक्कोचा संघ 3-0 अशा फरकाने पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. कतार येथील एज्युकेशन सिटी स्टेडियम याठिकाणी स्पेन आणि मोरोक्को (Spain vs Morocco) या दोन संघामध्ये बाद फेरीचा सामना रंगला होता. सामन्याच्या संपूर्ण वेळेत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. 90 मिनिटानंतर अतिरिक्त वेळ देऊन त्यातही एकही गोल झाला नाही. अखेर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं, ज्यात मोरोक्कोच्या संघाने खासकरुवन गोलकिपरने दमदार प्रदर्शन दाखवत 3-0 अशा फरकाने सामना आपल्या नावावर केला.
आजचा हा स्पेन विरुद्ध मोरोक्को (SPN vs MOR) सामना अगदी रोमहर्षक असाच झाला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून तोडीस तोड खेळाचं प्रदर्शन केलं. दोन्ही संघाकडून चांगला डिफेन्स होत होता, काही प्रयत्न झाले पण गोल होऊ न शकल्याने निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 0-0 अशा समान गोलसंख्येवर होते. त्यात हे बाद फेरीचे सामने आहेत, आधीचे ग्रुप स्टेचे सामने ड्रॉ झाल्यास दोन्ही संघाना समान गुण येण्यात होते. पण आता बाद फेरीचे सामने असल्याने सामन्याचा निर्णय अतिरिक्त वेळ आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे घेण्यात येतो. क्रोएशिया आणि जपानमध्येही असंच झालं होतं. त्यानुसार पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. स्पेनच्या एकाही खेळाडूला गोल करता आला नाही आणि मोरोक्कोने मात्र 3 गोल करत 3-0 अशा फरकाने सामना जिंकला. मोरोक्कोच्या गोलकिपरने दमदार प्रदर्शन यावेळी केलं.
View this post on Instagram
आता रोनाल्डो उतरणार मैदानात
आज राऊंड ऑफ 16 सामन्यांचा अखेरचा दिवस असून मोरोक्को विरुद्ध स्पेन सामन्यानंतकर रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल मैदानात उतरणार आहे. एकीकडे मेस्सीचा संघ उपांत्यफेरीत पोहोचला असून रोनाल्डोच्या पोर्तुगालला उपांत्यफेरी गाठण्याची संधी आज आहे. आज ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल संघाला घेऊन मैदानात उतरणार असून त्यांच्यासमोर स्वित्झर्लंड संघाचं आव्हान असणार आहे. पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड हा बाद फेरीचा सामना आज मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी पार पडणार आहे. कतार येथील लुसेल स्टेडियम याठिकाणी हा सामना रंगणार आहे.
हे देखील वाचा-