FIFA Rankings : जागतिक स्तरावर भारतीय फुटबॉल टीमची अप्रतिम कामगिरी, फिफा रँकिंगमध्ये टीम इंडियाला फायदा
Team India FIFA Ranking : भारतीय पुरुष फुटबॉल संघाने काही दिवसांपूर्वीच फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली ज्यानंतर आता जागतिक रँकिंगमध्येही संघाला फायदा झाला आहे.
FIFA Rankings Indian Football Team : भारतीय पुरुष फुटबॉल संघाने (Indian Football team) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक फिफा रँकिंगमध्ये (World Football Ranking) दोन स्थानांची झेप घेत 106 व्या स्थानावरुन 104 वं स्थान मिळवलं आहे. आशियाई कपमध्ये एन्ट्री मिळवल्यामुळे हा फायदा टीम इंडियाला झाला आहे. दुसरीकडे भारतीय महिला फुटबॉल टीमने देखील 59 व्या स्थानालरुन 56 वं स्थान मिळवत तीन स्थानांची झेप घेतली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय फुटबॉल संघाने एएफसी आशियाई कप क्वॉलीफायर अभियानमध्ये शानदार प्रदर्शन करत अफगानिस्तान, कंबोडिया आणि हॉंगकॉंग यांना तीन सामन्यात मात देत ग्रुप डीमध्ये अव्वल स्थान मिळवलं. ज्यामुळे फिफा रँकिंगमध्ये संघाला हा फायदा झाला आहे. दुसरीकडे महिला संघाने यंदाच्या वर्षाची सुरुवातच दमदार केली. दोन आंतरराष्ट्रीय संघाना मात देत महिला संघाने फिफा रँकिंगमध्ये ही झेप घेतली आहे.
'फिफा नेशन्स कप 2022'साठी पात्र
फिफा नेशन्स कप च्या यंदाच्या सीजनमध्ये भारत आशिया/ओशिनिया क्षेत्रात होता. भारताला प्ले-इन्समध्ये स्थान दिलं गेलं होतं. यावेळी प्लेऑफमध्ये भारताला एन्ट्री मिळाली होती. प्ले-इनच्या दरम्यान भारताने 32 सामने खेळले, ज्यातील 12 सामने जिंकत, 11 मध्ये भारत पराभूत झाला. तर 9 सामने अनिर्णीत ठरले. संपूर्ण 4 साने भारताने डिविजन 1 मध्ये स्थान कायम ठेवलं. ज्यामुळे सत्राच्या अखेरीस भारत वर्ल्ड रँकिंगमध्ये 19 व्या नंबरवर राहिला आणि दिमाखात पात्रता मिळवली. यावेळी भारताने चरणजोत सिंह, सिद्ध चंदराना आणि सारांश जैन यांच्या खेळीच्या मदतीने कोरिया आणि मलेशिया सारख्या संघाना मात देत ही पात्रता मिळवली आहे.
हे देखील वाचा-