एक्स्प्लोर

Sarfaraz Khan: सर्फराज खाननं भारतीय कसोटी संघाचं दार ठोठावलं, बांगलादेश दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता

Madhya Pradesh vs Mumbai Final: मुंबईचा फलंदाज सर्फराज खाननं रणजी ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन करून दाखवलंय.

Madhya Pradesh vs Mumbai Final: मुंबईचा फलंदाज सर्फराज खाननं रणजी ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. बंळुरूच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सर्फराज खाननं (Sarfaraz Khan) मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावलंय. विशेष म्हणजे, सर्फराजनं रणजी ट्रॉफीतील मागील 12 सामन्यात सात शतक आणि पाच अर्धशतक झळकावलंय. या हंगामात त्यानं आतापर्यंत 900 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामुळं बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सर्फराजकडं दुर्लक्ष करणं कठीण
बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, सर्फराज खानला बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. "सर्फराजकडं दुर्लक्ष करणं कठीण आहे.  त्याची कामगिरी भारतीय संघावर दबाव टाकत आहे. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेत भारत अ संघाकडूनही त्यानं चांगली फलंदाजी केली होती. तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे", असं बीसीसीआयच्या सुत्रानं म्हटलंय. 

सर्फराजच्या शतकामुळं मुंबईची धावसंख्या 350 पार
रणजी ट्रॉफी 2022 मध्ये मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खाननं कहर सुरूच ठेवलाय. या हंगामातील अखेरच्या पाच सामन्यात त्यानं तीन शतकं झळकावली आहेत. मध्य प्रदेशविरुद्ध सुरु असलेल्या रणजी 
ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याच्या शतकी खेळीमुळं मुंबईचा संघ पहिल्या डावात 350 धावांचा टप्पा पार करू शकला.

सर्फराजची चमकदार कामगिरी
रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सर्फराज खाननं सहा सामन्यातील आठ डावात 937 धावा केल्या. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत सर्फराज अव्वल स्थानी आहे. त्याची सरासरी 130 पेक्षा अधिक आहे. यादरम्यान त्यानं चार शतक आणि दोन अर्धशतक केली आहेत. रणजी ट्रॉफीच्या मागच्या हंगामातही त्यानं दमदार प्रदर्शन करून दाखवलं. मागील हंगामात त्यानं 154.66 च्या सरासरीनं 928 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतकांचा समावेश होता.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Politics : तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
Swarget Bus Depo Crime: सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर
मोठी बातमी:  नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली,  रायगडचा पेच कायम
मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 27 February 2025Pune Swargate Bus Depot : स्वारगेट केसप्रकरणी नराधमाला अजूनही अटक नाही, पोलिसांच्या आठ टीम कार्यरतABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 27 February 2025Special Report | Pakistan Shiv Mandir | पाकिस्तानात बम बम भोले,  कटास राज शिवगंगा मंदिरातून रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics : तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
Swarget Bus Depo Crime: सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर
मोठी बातमी:  नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली,  रायगडचा पेच कायम
मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम
ENG vs AFG Champions Trophy 2025 : इंग्लंड हरल्यानंतर 'तो' व्यक्ती मैदानात शिरला, सेलिब्रेशन करणाऱ्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची कॉलर पकडली अन्... Video
इंग्लंड हरल्यानंतर 'तो' व्यक्ती मैदानात शिरला, सेलिब्रेशन करणाऱ्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची कॉलर पकडली अन्... Video
SIP : अस्थिर बाजारामुळं 61 लाख खाती बंद, तेजी घसरणीवेळी एसआयपी सुरु ठेवावी का? तज्ज्ञांचा नेमका सल्ला काय?
शेअर बाजारातील घसरणीचा धसका, 61 लाख एसआयपी खाती बंद, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?
Pune Crime Swargate bus depot: स्वारगेट बस डेपोत तरुणीवर अत्याचार करणारा नराधम बड्या नेत्याचा कार्यकर्ता, पोलिसांशी ओळखी; धक्कादायक माहिती उघड
स्वारगेट बस डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं राजकीय कनेक्शन; पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता
एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला,
एकनाथ शिंदे जे म्हणाले तेच सांगत अफगाणिस्तानच्या कोचने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला, म्हणाला, "आम्हाला हलक्यात घेऊ नका"
Embed widget