एक्स्प्लोर
FIFA 2018 : फ्रान्सची फायनलमध्ये धडक, बेल्जियमवर 1-0 ने मात
फ्रान्सच्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो बचावपटू सॅम्युअल उमटिटी. त्याने मारलेला उत्तरार्धातला गोल सामन्यात निर्णायक ठरला. त्याच्या या गोलनं फ्रान्सला फिफा विश्वचषकाच्या फायनलचं दार उघडून दिलं.
सेंट पीटर्सबर्ग : रशियातील सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममध्ये रंगलेल्या उपांत्यफेरीच्या लढाईत फ्रान्सने बेल्जियमवर मात करत फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फ्रान्सनं बेल्जियमचा 1-0 असा पराभव केला. फ्रान्सची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे.
फ्रान्सच्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो बचावपटू सॅम्युअल उमटिटी. त्याने मारलेला उत्तरार्धातला गोल सामन्यात निर्णायक ठरला. त्याच्या या गोलनं फ्रान्सला फिफा विश्वचषकाच्या फायनलचं दार उघडून दिलं.
सामन्यात दोन्ही संघ आक्रमक पाहायला मिळाले. पूर्वार्धापासूनच फ्रान्स आणि बेल्जियम या संघानी जोरदार आक्रमण केली. पण पूर्वार्धात यांपैकी एकाही संघाला गोल करता आला नाही.
उत्तरार्धात फ्रान्सने अधिक आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 51 व्या मिनिटाला फ्रान्सचा बचावपटू सॅम्युअल उमटिटीने सामन्यातील विजयी गोल केला. कॉर्नरवरून आलेल्या चेंडूला त्याने योग्य दिशा देत हा गोल केला. या गोलमुळे सामन्यात फ्रान्सने 1-0 ने आघाडी मिळवली. तर निर्धारित वेळेत बेल्जियमला गोल करता आला नाही.
सामन्यांच्या निर्धारित वेळेनंतर 6 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही बेल्जियमला बरोबरी साधता आली नाही. बेल्जियमविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेच्या तीन सामन्यांमधील फ्रान्सचा हा तिसरा विजय आहे.
फ्रान्सनं 1998 साली ब्राझिलचा 3-0 असा धुव्वा उडवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. 2006 सालच्या विश्वचषकात फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्या वेळी फ्रान्सनं इटालीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 अशी हार स्वीकारली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement