एक्स्प्लोर
इंग्लंडकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्सला 'न्यूझीलंडर ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नामांकन
इंग्लंडच्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्सची 'न्यूझीलंडर ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
वेलिंग्टन : इंग्लंडच्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्सची 'न्यूझीलंडर ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमधला आहे. त्याचे मूळ नागरिकत्वदेखील न्यूझीलंडचे आहे. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये इंग्लंडसाठी विश्वचषक जिंकूनही स्टोक्सची 'न्यूझीलंडर ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी शिफारस होणे यासाठी न्यूझीलंडच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराच्या शर्यतीत त्याच्यासोबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही आहे.
‘ओव्हर थ्रो’ च्या धावा स्टोक्सला अमान्य, जेम्स अँडरसनची माहिती
'न्यूझीलंडर ऑफ द इयर' पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सचे वडील गेरार्ड आणि त्याची आई डेब हे आजही न्यूझीलंडमधल्या ख्राईस्टचर्चमध्ये राहतात. गेरार्ड स्टोक्स हे काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये रग्बी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.
विजयानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली!
बेन स्टोक्स त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी वडीलांसोबतच इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. पुढे इंग्लंडमध्ये तो एक क्रिकेटर म्हणून तो घडला आणि खेळलाही इंग्लंडसाठीच. यंदा इंग्लंडला विश्वचषक जिंकून देऊन बेन स्टोक्सने नवा इतिहास घडवला. स्टोक्सच्या नाबाद 84 धावांच्या खेळीने इंग्लंडला विश्वचषकाची फायनल पहिल्यांदा टाय करून दिली. मग सुपर ओव्हरमध्येही त्याने नाबाद आठ धावा फटकावल्या. त्यामुळे इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक उंचावता आला.
विश्वचषकाच्या फायनलमधील पराभव पचवणं कठीण : ट्रेण्ट बोल्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement