एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार
कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर यांनी स्टार स्पोर्ट्सवरच्या एका लाईव्ह कार्यक्रमात ही घोषणा केली. कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी शिलेदार रॉबिन उथप्पाची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.
मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या आगामी मोसमासाठी दिनेश कार्तिकच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर यांनी स्टार स्पोर्ट्सवरच्या एका लाईव्ह कार्यक्रमात ही घोषणा केली.
कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी शिलेदार रॉबिन उथप्पाची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. आयपीएलच्या रणांगणात कोलकात्याचा सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होत आहे. हा सामना 8 एप्रिलला ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येईल.
''कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्त्व करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. केकेआर आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे आणि मी नव्या आव्हानासाठी तयार आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या या संघाचं नेतृत्त्व करण्यासाठी उत्सुक आहे,'' असं दिनेश कार्तिकने पत्रकार परिषदेत सांगितलं.
कोलकाता नाईट रायडर्स (एकूण खेळाडू - 19)
- सुनील नारायण
- आंद्रे रसल
- मिचेल स्टार्क
- ख्रिस लीन
- दिनेश कार्तिक
- रॉबिन उथप्पा
- पियुष चावला
- कुलदीप यादव
- शुबमान गिल
- इशांक जग्गी
- कमलेश नागरकोटी
- नितीश राणा
- विनय कुमार
- अपूर्व वानखेडे
- रिंकू सिंह
- शिवम मावी
- कॅमरॉन डेलपोर्ट
- मिचेल जॉन्सन
- जेव्हन सिअरलेस
युवराजला 90 टक्के मतं, तरीही अश्विन पंजाबचा कर्णधार, सेहवाग म्हणतो...
यंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर
लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस, मात्र पंजाबसमोर मोठी अडचण
... म्हणून अनसोल्ड राहिलेल्या गेलवर बोली लावली : सेहवाग
आयपीएल लिलाव : 800 अब्जांच्या मालकाच्या मुलावर 30 लाखांची बोली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement