एक्स्प्लोर

गौतम गंभीरला झटका, हायकोर्टाने याचिका फेटाळली

दिल्ली उच्च न्यायालयाने गौतम गंभीरला झटका दिला आहे. कोर्टाने गंभीरची याचिका फेटाळली आहे.

नवी दिल्ली: टीम इंडियाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एका रेस्टोरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरलं होतं, ते हटवण्याची मागणी गंभीरने याचिकेद्वारे केली होती. मात्र कोर्टाने त्याला नकार दिला. त्याचं कारण म्हणजे त्या पबच्या मालकाचं नावही गौतम गंभीरच आहे. त्यामुळे कोर्टाने ते नाव न वापरण्याची गंभीरची मागणी फेटाळली. काय आहे संपूर्ण प्रकरण? पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाक परिसरात डीएसपी आणि कंपनीचे दोन पब आहेत. घुंघरू आणि हवालात अशी त्यांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या पब मालकाचंही नाव गौतम गंभीर आहे. या पबची जाहिरात ‘बाय गौतम गंभीर’ अशी केली जाते. मात्र हे पब आपलेच आहेत अशी लोकांची धारणा होत आहे, त्यामुळे गौतम गंभीर हे नाव हटवावं, अशी मागणी क्रिकेटपटू गंभीरने केली होती. या नावामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचंही गंभीरने याचिकेत म्हटलं होतं. पण कंपनीने कोर्टात दावा केला की, मालकाचं नावही गौतम गंभीर असल्यामुळे आम्ही तेच वापरत आहोत. कोर्टाने कंपनीचं म्हणणं मान्य करत, क्रिकेटपटू गंभीरला झटका देत, त्याची याचिका फेटाळली. गंभीर टीम इंडियातून बाहेर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करणारा गौतम गंभीर सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. गंभीर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2016 मध्ये, तर शेवटचा वन डे सामना जानेवारी 2013 मध्ये खेळला आहे. गंभीर हा भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या टी 20 आणि 2011 च्या वन डे विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता. गंभीरने 58 कसोटीत 9 शतकं, 22 अर्धशतकांसह 4154 धावा केल्या आहेत. तर त्याने 147 वन डेत 11 शतकं आणि 34  अर्धशतकं ठोकली असून, 5238 धावा केल्या आहेत. याशिवाय गंभीरने 37 टी ट्वेण्टीत 7 अर्धशतकांसह 932 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget