एक्स्प्लोर

Delhi Court on Sushil Kumar : कुस्तीपटू सुशील कुमारला सुनावली न्यायालयीन कोठडी

Delhi Court on Sushil Kumar :  दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला  दिल्ली कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत मुदतवाढ मागणारी दिल्ली पोलिसांची याचिका कोर्टाने नाकारली आहे. 

Delhi Court on Sushil Kumar :  दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड (Chhatrasal Stadium murder case) याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला(Sushil Kumar)  दिल्ली कोर्टाने (Delhi Court)न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत मुदतवाढ मागणारी दिल्ली पोलिसांची याचिका कोर्टाने नाकारली आहे. आता सुशील कुमारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

दिल्ली पोलिसांनी तिसऱ्यांदा पोलिस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी म्हटलं की, सुशीलकुमार हा चौकशीत सहकार्य करत नाही. तो म्हणत आहे की, मला माहित नाही हे कसं घडलं. पोलिसांनी सांगितलं की, अजून या प्रकरणातील डीव्हीआर मिळालेला नाही. तसेच हत्येच्या वेळी आरोपींनी घातलेले कपडेही मिळालेले नाहीत. हे सर्व हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

उत्तर रेल्वेकडून सुशील कुमारला सेवेतून निलंबित

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला अटक झाली आहे. या कारवाईनंतर उत्तर रेल्वेने मंगळवारी सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या निलंबनाचा आदेश अबाधित राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते. सागर धनकड हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले आहे.

ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमारला 6 दिवसांची पोलीस कोठडी; 23 वर्षीय कुस्तीपटूच्या हत्याप्रकरणात अटक

उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी त्याला निलंबित करताना म्हटलं की, सुशील कुमारविरुद्ध तपास सुरु आहे. त्याला 23 मे 2021 रोजी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. म्हणूनच त्याच्या अटकेच्या तारखेपासून त्यांची सेवा निलंबित केली जात आहे. विशेष म्हणजे सागर धनकड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील कुमार जवळजवळ दोन आठवडे पोलिसांपासून पळत होता. पण सुशीलला मुंडका परिसरातून अटक करण्यात आली.

Chhatrasal Stadium Murder Case : हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत

सागर धनकडचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट

सागर धनकड याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघडकीस आलेल्या माहितीनुसार, सागर धनकड यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. डोक्यापासून गुडघ्यापर्यंत जखमा आढळल्या आहेत. त्याच्या अंगावर 1 ते 4 सेंटीमीटर खोल जखमा असल्याने त्याच्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची माहिती पोस्टमार्टममधून समोर आली आहे. या जखमा इतक्या खोल होत्या की हाडांपर्यंत पोहोचल्या आहेत. छाती आणि पाठीवर 5x2 सेंमी आणि पाठीवर 15x4 सेंमी जखमा आढळल्या आहेत.

20 दिवसानंतर दिल्लीच्या मुंडका येथून आरोपीला अटक
ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजय यांना हत्येच्या 20 दिवसानंतर अटक करण्यात आली होती. आपल्या साथीदाराबरोबर एकाला भेटायला स्कूटीवर जात असताना सकाळी सुशील कुमार व त्याचा साथीदार अजय याला दिल्ली पोलिसांनी मुंडका मेट्रो स्टेशनवरून अटक केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget