DC vs CSK: दिल्ली आणि चेन्नई 'आमने- सामने'; तुल्यबळ संघातील लढत रोमांचक होणार, अशी असेल प्लेईंग इलेव्हन
जरी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोनही टिम्सने प्लेऑफवर आपली जागा नक्की केली असली तरी त्यांच्यासाठी हा सामना महत्वपूर्ण ठरणार आहे.
Delhi vs Chennai: आयपीएलमध्ये आज (4 ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. ही मॅच दुबईमध्ये संध्याकाळी ७.३० वाजता खेळली जाईल. जरी दिल्ली आणि चेन्नई या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये आपली जागा नक्की केली असली तरी त्यांच्यासाठी हा सामना महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण या सामन्यानंतर कोणता संघ अव्वल स्थानावर येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चेन्नई आणि दिल्ली या संघांमध्ये आत्तापर्यंत 12-12 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रत्येकी 9-9 सामने जिंकले आहेत. दोन्ही 18-18 पॉइंट आहेत. याचबरोबर चेन्नईची संघ पॉइंट टेबलवर पहिल्या आणि दिल्लीची टिम दुसऱ्या नंबरवर आहे. आज जो संघ जिंकेल तो पॉइंट टेबलवर पहिल्या क्रमांकावर जाईल.
आयपीएल 2020 मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नईच्या टिमने यावेळी लक्षवेधी कामगिरी केली. यावेळी चेन्नई संघाने प्लेऑफमध्ये जागा मिळणाऱ्या पहिल्या संघाचा मान मिळवला आहे. पण एमएस धोनीच्या या टिमला शनिवारी(2 ऑगस्ट) राजस्थान रॉयल्सच्या विरोधात हार पत्करावी लागली. तसेच दिल्लीने मागील सामन्यान मुंबई इंडियन्ससोबतच्या सामन्यात विजय मिळवला होता.
KKR vs SRH: हैदराबादला पराभूत करत कोलकाताचे प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल
पिच रिपोर्ट
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची पिच फलंदाजासाठी चांगली ठरू शकते. त्यामुळे टॉस जिंकणारी पहिली टिम फलंदाजी घेऊ शकते असा अंदाज आहे.
Rashid Khan : राशिद खानने 'धोनी स्टाईल'ने हेलिकॉप्टर शॉट मारला पण..., व्हिडीओ होतोय व्हायरल
सामन्याचे प्रिडीक्शन
जरी या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सची बाजू मजबूत आहे. तरी मॅच प्रिडीक्शन मीटरनुसार या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स ही टिम जिंकू शकते. पण हा सामना हाय स्कोअरींग आणि रोमांचक होऊ शकतो.
असे होऊ शकते Playing 11
चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन: फाफ डु प्लेसी, रुतुराज गायकवाड़, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर आणि जोश हेजलवुड
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कॅप्टन), शिमरन हेटमयार, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, कगीसो रबाडा आणि अवेश खान