Organic Farming: सुपीक माती आणि आनंदी शेतकरी, जैविक शेतीमुळं शेतकऱ्यांचं आयुष्य कसं बदललं?
Organic Farming in India: पतंजलीच्या जैविक शेती मातीचं आरोग्य आणि पिकांना पौष्टिक करुन पर्यावरण संरक्षण केलं जातं. याशिवाय शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि चांगल्या प्रतीचं बियाणं देऊन आर्थिक स्थिती मजबूत केली जाते.

Farming in India: भारतात शेती हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. मात्र, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अधिक वापरामुळं मातीची ताकद कमी झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पतंजली आयुर्वेदनं जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठं पाऊल टाकलं आहे. पतंजलीचा उद्देश मातीला पुन्हा समृद्ध करणं आणि शेतकऱ्यांना आर्थिक रुपात मजबूत करणं हा आहे.
कंपनीनं सांगितलं की, पतंजलीच्या शेतकरी समृद्धी कार्यक्रमात शेतकऱ्यांना जैविक शेती शिकवली जाते. पतंजलीच्या जैविक खते आणि जैविक प्रोम या सारख्या उत्पादनांचा उपयोग सांगितला जातो. ही खते औषधीय वनस्पती, शेण आणि ट्रायकोडर्मा या सारख्या चांगल्या सूक्ष्मजीवांकडून तयार होतं. याच्यामुळं मातीचा पोत सुधारतो, ज्यामुळं माती पाणी आणि पोषक तत्वांना चांगल्या प्रकारे रोखते. यामुळं मातीचाी ताकद वाढते, पीकं चांगली येतात.
जैविक शेतीमुळं पर्यावरण संतुलनाला मदत
कंपनीच्या दाव्यानुसार, रासायनिक शेतीच्या तुलनेत पतंजलीच्या जैविक शेतीमुळं पाण्याची बचत होते आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते. याचं उत्पादन ह्यूमिक एसिड, आणि समुद्रातील शैवाळाचं खत, मातीतील पोषण तत्वांचं संतुलन राखतात. यामुळं पिकांना रोगांच्या प्रादुर्भावाशी लढण्यास मदत मिळते. उत्पादन जास्त होतं, शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होते, ही पद्धत फक्त पर्यावरणासाठी चांगली नाही तर जुन्या भारतीय शेतीच्या ज्ञानाचं पुनरुज्जीवन करण्यात मदत करतं.
पतंजलीचं जैविक अभियान सामाजिक बदल
कंपनीनं म्हटल की, पतंजली बायो रिसर्च इन्स्टिट्यूटनं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेसोबत मिळून चांगल्या बियाण्यांवर आणि नव्या तंत्रावर काम केलं आहे. यामुळं शेतकऱ्यांना चांगलं बियाणं आणि टिकाई शेतीचे मार्ग मिळतात. ज्यामुळं त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. पतंजलीचं हे जैविक अभियान फक्त व्यवसाय नाही तर सामाजिक अभियान आहे. ते मातीला सुपीक, पिकांना पौष्टिक आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल आहे. यामुळं गावात आर्थिक सुबत्ता येत आहे. पर्यावरण संरक्षणासह ते सुपीक जीवनाला प्रोत्साहन देत आहेत.























