एक्स्प्लोर

बोरीवलीतील काहीजण तुर्कीला गेले, कट्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय, ATS च्या हाती महत्वाचे धागेधोरे 

पडघा (Padgha) येथील बोरीवली (Borivali)  गावात दहशतवादविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. ही तरुण तुर्कीत (Turkey)  जावून आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

Maharashtra ATS मुंबई : पडघा (Padgha) येथील बोरीवली (Borivali)  गावात दहशतवादविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. बोरीवली गावातील काही तरुण तुर्की (Turkey)  येथे जावून आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. कारण तपास यंत्रणांना तुर्कीशी संबधित काही कागदपत्र मिळाली आहेत. त्यामुळं संशयित व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार आहे. मागील काही वर्षात कोण कुठे गेले होते? काय कारणं होती? याचा तपास केला जाणार आहे.  

यातील काही संशयितांनी तुर्की येथे जावून ISIS या दहशतवादी संघटनेच्या काही प्रमुखांची भेट घेतल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. कट्टर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात बोरीवलीतील काही तरुण असल्याचा तपास यंत्रणांना संशय आला आहे. त्यामुळं सध्या पोलिस कसून तपास करत आहेत. 

साकिब नाचनच्या घरावरही छापे 

दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) म्हणजेच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा येथे काल छापा टाकला होता. एटीएस पथकाने साकिब नाचनच्या घरावरही छापे टाकत आहे. दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेचा पदाधिकारी असलेल्या साकिबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये 2002- 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला, असा आरोप त्याच्यावर आहे. 

शेकडो पोलीस बंदोबस्त घेऊन बोरवली गावातील अनेक घरांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. बोरवली गावातील 21 ठिकाणी ATS ने छापेमारी करत चौकशी केली होती. घरातील झडती घेण्यात आली शिवाय अनेक जणांचे मोबाईल चेक करण्यात आले होते. मोबाईल सिज करण्यात आले आहे. साकिब नाचन यांच्या घरी देखील सर्च ऑपरेशन राबवण्यात आले तसेच साकिब यांच्या नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक जणांचे मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत तर दुसरीकडे अनेकांच्या घरात झडती घेत असताना त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, तलवार ,सुरा, मालमत्तेबाबत संशयास्पद कागदपत्रे, दहशतवाद यास उत्तेजन देणारे आक्षेपहार्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. 10 तास चाललेल्या या कारवाईदरम्यान सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात बोरवली गावात राबवण्यात आला होता.
 
यादरम्यान एटीएसने संसयास्पद वस्तू जप्त केल्या असून अजूनपर्यंत कोणाला अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेले नाही. एटीएसने अनेकांकडून चौकशी केली आहे मात्र कायदेशीर प्रक्रिया व चौकशी पूर्ण केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवाय एटीएस ने जप्त केलेल्या कागद पत्रात संसयास्पद आढळल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते. तर कायदेशीर प्रक्रिया व चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
ATS Action In Pune: पुण्यातील 60 जणांच्या घरावर ATS चे एकाचवेळी छापे; 51 जणांची चौकशी, धाड टाकताच काय काय सापडलं?
पुण्यातील 60 जणांच्या घरावर ATS चे एकाचवेळी छापे; 51 जणांची चौकशी, धाड टाकताच काय काय सापडलं?
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
Abhijeet Kelkar On Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...
तुकाराम मुंढेंकडून धडक कारवायांचा सपाटा, मराठी अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांना टॅग करत पोस्ट, केलीय मोठी मागणी...

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Embed widget