एक्स्प्लोर

Deaflympics 2021 : गोल्फर दिक्षा डागरने रचला इतिहास, मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये मिळवलं सुवर्णपदक

Gold in Deaflympics 2021: दिक्षाने याआधी देखील 2017 साली भारतासाठी या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. दोन वेळेस पदक जिंकणारी ती पहिली गोल्फर बनली आहे.

Diksha Dagar Gold in Deaflympics 2021 : ब्राझीलच्या कॅसियस दो सूल या शहरात सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक (Deaflympics) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताने आणखी एक सुवर्णपदक खिशात घातलं असून भारताची गोल्फर दिक्षा डागरने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. दिक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या ऍशलिन ग्रेसचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे दिक्षाने याआधी टर्की इथे झालेल्या 2017 सालच्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्यपदक मिळवल्याने दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे.

Deaflympics 2021 : गोल्फर दिक्षा डागरने रचला इतिहास, मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये मिळवलं सुवर्णपदक

श्रवणदोष असणारी दिक्षाने वयाच्या सहाव्या वर्षापासून श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. पण बालपणीपासूनच खेळाची आवड असलेल्या दीक्षाने गोल्फ खेळात आजवर उत्तम कामगिरी केली आहे.  21 वर्षीय डावखुऱ्या दिक्षाने अनेक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धांमध्ये महिला गटात अप्रतिम कामगिरी केली आहे. अनेक युरोपियन देशात तिने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये, दिक्षा टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली आणि डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही खेळांमध्ये खेळणारी पहिली गोल्फर बनली आहे. 2019 च्या सुरुवातीलाच दिक्षाने दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली महिला ओपन गोल्फ स्पर्धाही जिंकली होती.   

भारताची मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी 

दीक्षाने ही सुवर्णकामगिरी करण्याआधीही भारतीय खेळाडूनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारताने याच मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात देखील सुवर्णपदक मिळवलं. भारतीय संघाने जपानच्या खेळाडूंना फायनलमध्ये 3-1 ने मात देत हे सुवर्णपदक मिळवलं. तसंच धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं असून शौर्य सैनीने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आठ खेळाडूंमध्ये फायनल सामना खेळवला गेला होता. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Embed widget