एक्स्प्लोर
बॉल टॅम्परिंगनंतर वॉर्नरच्या खासगी आयुष्यात वादळ, पत्नीचा गर्भपात
आम्ही पार कोलमडून गेलो होतो. बॉल टॅम्परिंगच्या वादानंतर आम्ही अपमान सहन करत होतो, त्यातच या घटनेने आम्ही दु:खात बुडालो.
सिडनी : बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरच्या खासगी आयुष्यातही मोठं वादळ आलं आहे. बॉल टॅम्परिंगच्या घटनेनंतर माझा गर्भपात झाला, असं वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरने सांगितलं. मार्चमधील पत्रकार परिषदेच्या एक आठवड्यानंतर मी बाळाला गमावलं. गर्भपाताला अतिरिक्त तणाव आणि 23 तासांचा विमान प्रवास जबाबदार असल्याचं कँडिस म्हणाली.
ऑस्ट्रेलियामधील महिलांच्या एका साप्ताहिकेला दिलेल्या मुलाखतीत कँडिस म्हणाली की, "माझं रक्त जातंय, असं मी डेवला बाथरुममध्ये बोलावून सांगितलं. आमचं बाळ जिवंत नसल्याचं आम्हाला समजलं. त्यावेळी आम्ही खूप रडलो."
"आम्ही पार कोलमडून गेलो होतो. बॉल टॅम्परिंगच्या वादानंतर आम्ही अपमान सहन करत होतो, त्यातच या घटनेने आम्ही दु:खात बुडालो. पण त्याच वेळी आम्ही ठरवलं की, आता अशाप्रकारच्या कोणत्याही गोष्टीचा आपल्या आयुष्यावर परिणार होऊ द्यायचा नाही," असंही कँडिसने सांगितंल.
डेव्हिड आणि कँडिस वॉर्नर यांना आयव्ही माय (3 वर्ष) आणि इंडी राय (2 वर्ष) ह्या दोन मुली आहेत. कँडिस म्हणाली की, "आम्हाला आमच्या कुटुंबात तिसरं अपत्य हवं होतं. केपटाऊनमध्ये असताना प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने वॉर्नर दाम्पत्य आनंदात होतं. मी प्रेग्नन्सीच्या पहिल्या टप्प्यात होते. माझ्या शरीरात बदल होत होते. आम्ही अतिशय आनंदात होतो. आम्हाला माहित होतं की छोटा वॉर्नर येणार आहे. आम्ही यासाठी मागील वर्षाच्या जुलैपासून प्रयत्न करत होतो. केपटाऊनमध्ये गेल्यावर मी तपासणी केली होती."
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसरे कसोटी सामन्यादरम्यान बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) आपल्या 3 क्रिकेटपटूंवर बंदीची कारवाई केली होती. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकप्तान डेव्हिड वॉर्नरवर प्रत्येकी एका वर्षाची तर कॅमरुन बँक्राफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली आहे. मात्र या तिघांनी क्लब क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement