Lovepreet Singh: लवप्रीत सिंह आहे तरी कोण? ज्यानं कॉमनवेल्थमध्ये भारतासाठी जिंकलं कांस्यपदक!
Lovepreet Singh: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत (Birmingham 2022 Commonwealth Games) भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
Lovepreet Singh: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत (Birmingham 2022 Commonwealth Games) भारतीय खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पाचव्या दिवशीही भारताचा वेटलिफ्टिर लवप्रीत सिंहनं 109 किलोग्राम वजन गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. लवप्रीत सिंहनं स्नॅचमध्ये 163 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 192 किलो असं एकूण 355 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. लवप्रीतच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताची राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदकसंख्या सहा सुवर्णासह चौदावर पोहचलीय. लवप्रीतच्या कामगिरीबद्दल देशभरातून कौतूक होतं आहे.
लवप्रीत सिंह कोण आहे?
लवप्रीत सिंह हा 24 वर्षाचा असून तो पंजाबच्या अमृतसर येथील रहिवाशी आहे. त्यानं कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमच्या 109 किलोग्राम वजनी गटात रौप्यपदक जिंकलं होतं. ज्यामुळं तो कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्र ठरला. लवप्रीत सिंहनं एशियन ज्यूनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तसेच त्यानं कॉमनवेल्थ ज्युनिअर चॅम्पियनशिपचाही खिताब जिंकलाय. त्यानं आतापर्यंत एकूण 13 पदकं जिंकली आहेत. यातील सर्वाधिक 8 पदकं त्यानं वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत. ज्यात तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे.
लवप्रीत सिंहची चांगली कामगिरी
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहनं चांगली कामगिरी केली. स्नेच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात त्यानं 157 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 161 आणि तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचललं. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात 185 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 189 आणि तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्राम उजन उचललं.
भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 5 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.)
कांस्यपदक- 4 (गुरुराज पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह.)
हे देखील वाचा-
- ICC T20 Rankings: आयसीसी टी-20 क्रमवारीत सुर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी, गोलंदाजांमध्ये जोश हेजलवुड अव्वल
- CWG 2022: भारताच्या पदकसंख्येत आणखी भर; देशासाठी पदक जिंकून बर्मिंगहॅमध्ये तिरंगा फडकावलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
- CWG 2022 Day 6 Schedule: भारतीय बॉक्सरसह सौरव घोषाल पदक जिंकण्यासाठी सज्ज, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक