CWG 2022 Day 6 Schedule: भारतीय बॉक्सरसह सौरव घोषाल पदक जिंकण्यासाठी सज्ज, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक
Birmingham 2022 Commonwealth Games Day 6: र्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला आणखी पदक मिळण्याची शक्यता आहे.
Birmingham 2022 Commonwealth Games Day 6: र्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला आणखी पदक मिळण्याची शक्यता आहे. वर्ल्ड चॅम्पियन भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन आपली लढत जिंकून पदक मिळवण्याची आशा आहे.
फ्लायवेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत निकहत झरीनचा सामना उत्तर आयर्लंडच्या निकोला क्लाइडशी होईल, तर महिलांच्या लाइट मिडलवेट स्पर्धेत लोव्हलिना बोर्गोहेनचा सामना वेल्सच्या रोझी एक्लेसशी होईल. दोन्ही महिला बॉक्सर आपापल्या लढती जिंकून राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. तसेच त्यांचे सहकारी खेळाडू नितू, मोहम्मद हुसामुद्दीन आणि आशिष कुमार हे वेगवेगळ्या वजन गटांच्या उपांत्यपूर्व फेरीत पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
आजचा दिवस सौरव घोषालसाठी संस्मरणीय ठरण्याची शक्यता
आजचा दिवस भारताचा अनुभवी स्क्वॉशपटू सौरव घोषालसाठी खूप संस्मरणीय ठरू शकतो. पुरुष एकेरीत जोएल माकिनविरुद्ध तो कांस्यपदकासाठी दावेदारी करेल. जर सौरव जिंकण्यात यशस्वी ठरला, तर त्याचं हे पहिले राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक असेल.
अॅथलीट मनप्रीत कौरच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष
अॅथलेटिक्समध्ये भारतीय अॅथलीट मनप्रीत कौरवर महिलांच्या गोळा फेक स्पर्धेत पदकावर लक्ष असेल, तर तेजस्वीन शंकरलाही पुरुषांच्या उंच उडीत पदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये देशाचा तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न असेल.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना आज बार्बाडोसशी
भारतीय महिला हॉकी संघ कॅनडाविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतो. तर, भारतीय महिला क्रिकेट संघ अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्याच्या उद्देशानं बार्बाडोसविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
भारतीय खेळाडूंचं आजचं शेड्युल-
ऍथलेटिक्स
पुरुषांची लांब उडी अंतिम सामना: तेजस्वीन शंकर - रात्री 11:30
महिला गोळाफेक अंतिम सामना: मनप्रीत कौर - दुपारी 12:35 (4 ऑगस्ट)
बॉक्सिंग
महिला मिनिमनवेट उपांत्यपूर्व फेरी: नीतू विरुद्ध निकोला क्लाइड - दुपारी 4:45 वा.
पुरुष फेदरवेट उपांत्यपूर्व फेरी: मोहम्मद हुसामुद्दीन वि ट्रायगेन मॉर्निंग एनडेवेलो- संध्याकाळी 5:45 वा.
महिला लाइट फ्लायवेट उपांत्यपूर्व फेरी: निखत जरीन विरुद्ध हेलन जोन्स (वेल्स) - रात्री 11:15 वा.
महिला लाइट मिडलवेट उपांत्यपूर्व फेरी: लोव्हलिना बोर्गोहेन विरुद्ध रोझी ऍकल्स (वेल्स) - दुपारी 12:45 (4 ऑगस्ट)
पुरुष लाइट हेवीवेट उपांत्यपूर्व फेरी: आशिष कुमार विरुद्ध आरोन बोवेन (इंग्लंड) - दुपारी 2:00 वा. (4 ऑगस्ट))
क्रिकेट
अ गट: भारत विरुद्ध बार्बाडोस - रात्री 10:30
हॉकी
महिला पूल अ: कॅनडा विरुद्ध भारत - दुपारी 3:30 वा.
पुरुष पूल ब: भारत विरुद्ध कॅनडा - संध्याकाळी 6:30
लॉन बॉल स्पर्धा
पुरुष एकेरी, सेक्शन डी, : मृदुल बोरगोहेन विरुद्ध ख्रिस लॉक (FLK)- दुपारी 1:00 वा.
महिला जोडी, सेक्शन बी: भारत वि नियू - दुपारी 1:00 वा.
पुरुष एकेरी, सेक्शन डी: इयान मॅक्लीन (SCO) वि मृदुल बोरगोहेन - दुपारी 4:00 वा.
महिला जोडी, सेक्शन डी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत - दुपारी 4 वा.
मेन फोर्स सेक्शन सी: भारत विरुद्ध कुक बेटे - संध्याकाळी 7:30 वा.
महिला तिहेरी, सेक्शन सी: भारत वि नियू - संध्याकाळी 7:30 वा.
पुरुष फोर्स सेक्शन सी: इंग्लंड विरुद्ध भारत - रात्री 10:30 वा.
स्क्वॅश
मिश्र दुहेरी, 32 राऊंड: जोश्ना चिनप्पा / हरिंदर पाल सिंग संधू विरुद्ध येहेनी कुरुप्पू / रविंदू लक्ष्मीरी (श्रीलंका) - दुपारी 3:30 वा.
महिला एकेरी प्लेट फायनल्स: सुनयना कुरुविला वि. मेरी फंग-ए-फॅट (गियाना) -टीबीडी
पुरुष एकेरी कांस्यपदक सामना: सौरव घोषाल विरुद्ध जोएल माकिन - रात्री 9.30 वा.
जलतरण स्पर्धा
पुरुषांची 1500 मीटर फ्रीस्टाइल अंतिम सामना: कुशाग्र रावत, अद्वैत पेज - दुपारी 12:42 (4 ऑगस्ट)
वेटलिफ्टिंग
पुरुष 109 किलो अंतिम सामना: लवप्रीत सिंह – दुपारी 2:00 नंतर
महिला 87+ किलो अंतिम फेरी: पौर्णिमा पांडे - संध्याकाळी 6:30 वा.
पुरुष 109+ किलो अंतिम सामना: गुरदीप सिंह – रात्री 11:00 वा.