ICC T20 Rankings: आयसीसी टी-20 क्रमवारीत सुर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी, गोलंदाजांमध्ये जोश हेजलवुड अव्वल
ICC T20 Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं नुकतीच टी-20 क्रमावारीका जाहीर केलीय.
ICC T20 Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं नुकतीच टी-20 क्रमावारीका जाहीर केलीय. त्यानुसार भारताचा युवा फंलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तरबेज शम्सीला मोठा फायदा झालाय. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत सुर्यकुमार दुसऱ्या स्थानावर आहे. तर, गोलंदाजांच्या क्रमवारीत तरबेज शम्सीनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतलीय. टी-20 फलंदाजांच्या क्रमावारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानी कायम आहे.
आयसीसीचं ट्वीट-
वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 मध्ये सुर्यकुमारनं दाखवली कमाल
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारत 2-1 नं आघाडीवर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादवनं 44 चेंडूत 76 धावांची दमदार खेळी केली. या सामन्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला आयसीसी टी-20 क्रमावारीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
टी-20 विश्वचषकात सूर्यकुमारची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता
सूर्यकुमार यादवनं गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिकेत भारतीय संघाचा भाग असलेल्या सुर्यकुमार यादवनं तीन सामन्यात 168 स्ट्राईक रेटनं 111 धावा केल्या आहेत. एवढेच नव्हेतर, ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात त्याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंग्लंडविरुद्ध शम्सीचं दमदार प्रदर्शन
तबरेझ शम्सीनंही इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगलीच छाप पाडली. या मालिकेत त्यानं 8 विकेट घेतल्या. तर, तिसऱ्या टी-20 सामन्यात तबरेझ शम्सीनं 24 धावांत 5 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड अव्वल स्थानी आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत सुर्यकुमार यादवनं चांगली खेळी केली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही तो सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. मात्र, त्या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
हे देखील वाचा-
- Nagpur Sports : 'नेहरु कप' हॉकी क्रीडा स्पर्धेच्या नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदत
- CWG 2022: भारताच्या पदकसंख्येत आणखी भर; देशासाठी पदक जिंकून बर्मिंगहॅमध्ये तिरंगा फडकावलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
- CWG 2022 Country-wise Medal Tally: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचं दमदार प्रदर्शन; पदकतालिकेत कोणता संघ कितव्या क्रमांकावर?