Gurdeep Singh, CWG 2022: गुरदीप सिंहची प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर, वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं कांस्यपदक; भारताची पदकसंख्या सतरावर
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 109 किलोग्राम वजनी गटात भारताचा गुरूदीप सिंहनं कांस्यपदक जिंकलय.
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 109 किलोग्राम वजनी गटात भारताचा गुरूदीप सिंहनं (Gurdeep Singh) कांस्यपदक जिंकलय. दरम्यान, त्यानं स्नॅचमध्ये 167 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 223 किलोग्राम असं एकूण 390 किलो वजन उचलून बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावलाय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकांवर झडप घातलीय. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारतानं सर्वाधिक पदकं वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिंकली आहेत.
ट्वीट-
सुवर्णपदक कोणी जिंकलं?
भारतीय वेटलिफ्टर गुरदीप सिंहनं 109+ किलो ग्राम वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. त्यानं स्नॅच फेरीत तीन प्रयत्नात 167 किलो ग्राम वजन उचललं. यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 223 किलो ग्राम वजन उचललं. अशाप्रकारे एकूण 390 किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. पाकिस्तानच्या मुहम्मद नोह दस्तगीर बटनं एकूण 405 किलो ग्राम वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. त्याचवेळी न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यूने एकूण 394 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं
वेटलिफ्टिंगमध्ये भारताची दमदार कामगिरी
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समधील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 10 वं पदक आहे. 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं विक्रमी नऊ पदकं जिंकली होती.
कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 6 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)
कांस्यपदक- 6 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह)