CWG 2022: भारतीय महिला हॉकी संघ आज इंग्लंडशी भिडणार; कधी, कुठं पाहता येणार सामना?
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामातील पाचव्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघ (Indian Women's Hockey Team) इंग्लंडच्या महिला हॉकी संघाशी (England Women's Hockey Team) भिडणार आहे
Birmingham 2022 Commonwealth Games: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामातील पाचव्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघ (Indian Women's Hockey Team) इंग्लंडच्या महिला हॉकी संघाशी (England Women's Hockey Team) भिडणार आहे. दोन्ही संघानं पूल ए मध्ये एकही सामना गमावलेला नाही. भारतीय महिला हॉकी संघानं त्यांच्या पहिल्या सामन्यात घानाचा 11-0 नं पराभव केला. त्यानंतर वेल्सलाही 3-1 नं धुळ चाखली. दुसरीकडं इंग्लंडच्या महिला हॉकी संघानं आधी घाना आणि त्यानंतर कॅनडा महिला हॉकी संघाला नमवलं. पूल-अ मध्ये इंग्लंड अव्वल तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळं आजचा सामना अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे.
भारताची गुरजीत कौर आणि वंदना कटारिया चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. गुरजीतनं घानाविरुद्ध हॉकी सामन्यात दोन आणि वेल्सविरुद्ध एक गोल केला होता. तर, वंदनानं वेल्सविरुद्ध दोन गोल केले होते. यादरम्यान, भारतीय हॉकी संघाची कर्णधार सविता पूनियानं संघासाठी काही गोलही वाचवले आहेत. इंग्लंडची फॉरवर्ड हाना मार्टिन भारतीय संघासाठी अडचणी निर्माण करू शकते. फॉरवर्ड हाना मार्टिन गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दमदार कामगिरी करताना दिसली आहे. याशिवाय, डिफेंडर ग्रेस बाल्सडॉनही इंग्लंडाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो.
कधी, कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड महिला हॉकी संघ सामना कधी होईल?
हा सामना आज (2 ऑगस्ट) संध्याकाळी 06.30 वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध इंग्लंड महिला हॉकी संघ सामना कोणत्या चॅनलवर पाहता येईल?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
हा सामना ऑनलाइन पाहता येईल का?
होय, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह (Sony LIV) अॅपवर थेट पाहता येईल.
हे देखील वाचा-