CWG 2022: भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरचा लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम फेरीत प्रवेश
Commonwealth Games 2022: त्यानं पहिल्याच प्रयत्नात 8.05 मीटर लांब उडी मारून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील लॉन्ग जंप इव्हेंटमध्ये भारताचा लांब उडीपटू मुरली शंकरनं (Murali Sreeshankar) अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्याला 8 मीटर अंतर पार करायचं होतं. मात्र, त्यानं पहिल्याच प्रयत्नात 8.05 मीटर लांब उडी मारली आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.
भारताचा युवा लांबउडीपटू श्रीशंकर मुरली आणि अनीस यहियानं आज खेळण्यात आलेल्या लांब उडी स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. गट अ मध्ये सहभाग घेणाऱ्या श्रीशंकरनं पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात 8.05 मीटर लांब उडी मारत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं. दुसरीकडं ग्रुप मधून खेळणाऱ्या मोहम्मद याहियानं 7.68 मीटर लांब उडी मारत फायनलमध्ये धडक दिली. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
ट्वीट-
पुरुष टेबल टेनिस भारताला सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा
पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही उपांत्य फेरीत नायजेरियाचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला. आता मंगळवारी या संघाची सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढत होणार आहे.
राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील सलग पाचवं पदक जिंकण्यासाठी सीमा पुनिया उतरणार मैदानात
ऍथलेटिक्समध्ये, महिला डिस्कस थ्रोअर सीमा पुनिया सलग पाचवे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या वेळी एक कांस्य आणि चार रौप्य पदकांसह 39 वर्षीय सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक असेल.
भारताला मिळालेल्या पदकांची संख्या
सुवर्णपदक-3 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली)
रौप्यपदक- 3 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी)
कांस्यपदक-3 (गुरुराज पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर)
हे देखील वाचा-