CWG 2022 Day 6 Live Updates: क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला आणखी पदक मिळण्याची शक्यता आहे.
LIVE

Background
Gurdeep Singh, CWG 2022: गुरदीप सिंहनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकलं
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या 109 किलोग्राम वजनी गटात भारताचा गुरूदीप सिंहनं कांस्यपदक जिंकलाय. दरम्यान, त्यानं स्नॅचमध्ये 167 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 223 किलोग्राम असं एकूण 390 किलो वजन उचलून बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावलाय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकांवर झडप घातलीय. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सहा कांस्यपदक जिंकलंय. विशेष म्हणजे, भारतानं सर्वाधिक पदकं वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिंकली आहेत.
भारताचं आणखी एक पदक निश्चित, बॉक्सर निकहत झरीन उपांत्य फेरीत
वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निकहत झरीननं राष्ट्रकुल स्पर्धेत स्वत:चं आणि भारताचं पदक निश्चित केलंय. तिनं 48-50 किलो गटात उपांत्य फेरी गाठलीय. निकहतनं वेल्सच्या हेलन जोन्सचा पराभव केला. तिनं हा सामना 5-0 असा जिंकला.
Commonweath Games 2022: हरदीप कुमार, आर्यन कश्यप उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी
जागतिक अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठण्यात हरदीप कुमार, आर्यन कश्यप अपयशी ठरले. 400 मीटर अडथळा शर्यतीतील उपांत्यपूर्व स्पर्धेत दोघांनी अनुक्रमे 52.91 आणि 54.13 सेकंद वेळ नोंदवली.
CWG 2022: बार्बाडोसचा टॉस जिंकला, भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण
कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला क्रिकेट संघ बार्बाडोसशी (India Women vs Barbados Women) भिडणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बार्बाडोसनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघानं आपपल्या गटातील एक-एक सामना गमावलाय. या गटात समावेश करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट महिला संघानं उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलंय. तर, भारताविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्क करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.
CWG 2022: भारतीय पुरुष संघाचा कॅनडाशी सामना सुरू
भारतीय महिला हॉकी संघानं उपांत्य फेरी गाठली आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघानं कॅनडावर 3-3 अशी मात केली. आता उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सध्या भारतीय पुरुष संघाचा सामना कॅनडाशी सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
