एक्स्प्लोर
रोनाल्डोचा इटलीच्या क्लबशी 847 कोटींचा करार, अख्ख्या आयपीएलचा खर्च एका खेळाडूवर!
रोनाल्डोनं युवेन्टस क्लबशी चार वर्षांचा करार केला असून, त्यासाठी त्याला साडेदहा कोटी युरो मोजण्यात आले आहेत.
![रोनाल्डोचा इटलीच्या क्लबशी 847 कोटींचा करार, अख्ख्या आयपीएलचा खर्च एका खेळाडूवर! cristiano ronaldo leaves real madrid, to join Juventus in Italy रोनाल्डोचा इटलीच्या क्लबशी 847 कोटींचा करार, अख्ख्या आयपीएलचा खर्च एका खेळाडूवर!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/22204511/RONALDO.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्पेनच्या रिआल माद्रिदला गुडबाय करुन पोर्तुगालचा फुटबॉलवीर ख्रिस्तियानो रोनाल्डो इटालीच्या युवेन्टस क्बलच्या ताफ्यात सामील झाला आहे. रोनाल्डोनं युवेन्टस क्लबशी चार वर्षांचा करार केला असून, त्यासाठी त्याला साडेदहा कोटी युरो मोजण्यात आले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 847 कोटी रुपयांच्या घरात जाते.
ही रक्कम जवळपास भारतातील अख्ख्या आयपीएलच्या खर्चापर्यंत जाते. म्हणजेच संपूर्ण आयपीएलवर जेवढा खर्च केला जात, तेवढा खर्चा हा फुटबॉलमध्ये एका खेळाडूवर केल्याचं चित्र आहे. आयपीएलमध्ये यंदा इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक साडेबारा कोटीची बोली लावली होती.
जगातल्या सर्वोत्तम फुटबॉलवीरासाठीचा बॅलन डी' ओर हा किताब रोनाल्डोने तब्बल पाचवेळा पटकावला आहे. 2008 साली तो मॅन्चेस्टर युनायटेडच्या ताफ्यातून रिआल माद्रिदमध्ये सामील झाला होता. त्यावेळी रोनाल्डोला आठ कोटी पौंडाची रक्कम मोजण्यात आली होती. ती रक्कम त्याकाळात अंदाजे सव्वासहाशे कोटी रुपयांच्या घरात जात होती.
रोनाल्डोनं गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक 451 गोल लगावून रिआल माद्रिदला पुरेपूर मोबदला दिला. या काळात रिआल माद्रिदनं ला लिगाची दोन आणि चॅम्पियन्स लीगची चार विजेतीपदंही पटकावली.
रोनाल्डो गेल्या 9 वर्षांपासून रिआल माद्रिदकडून खेळत होता. मंगळवारी रियल माद्रिदने पोर्तुगालच्या या सुपरस्टारला इटलीच्या युवेन्टस क्लबने आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहोत, असं रोनाल्डोने म्हटलं आहे.
105 मिलियन युरोचा करार
इटलीच्या युवेन्टस क्लबने रोनाल्डोसोबत 105 मिलियन युरोचा करार केला. या क्लबने आपल्या ट्वीटरवर अकाऊंटवरी त्याबाबतची माहिती दिली.
नेमारपेक्षा कमीच
रोनाल्डोचा भला मोठा करार दिसत असला, तरी ब्राझीलचा स्टार फुटबॉलर 25 वर्षीय नेमार ज्युनियरपेक्षा अनेक पटींनी कमी आहे. नेमारला गेल्या वर्षी फ्रान्सचा फुटबॉल क्लब पेरिस सेंट जर्मेनने (पीएसजी) तब्बल 450 मिलियन युरो म्हणजेच 3634 कोटी रुपयांचा करार केला होता. त्यामध्ये त्याने 222 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 1790 कोटी रुपये त्याने ट्रान्सफर फी म्हणून बार्सिलोनाला दिली होती.
नेमारच्या तुलनेत रोनाल्डोचा 847 कोटींचा करार खूपच तोकडा वाटतो.
सहावा महागडा खेळाडू
स्पॅनिश मीडियानुसार, एका क्लबमधून दुसऱ्या क्लबमध्ये आलेल्या रोनाल्डोचा हा करार, फुटबॉल विश्वातील सहावा सर्वात महागडा करार आहे.
यापूर्वी नेमार (222 मिलियन युरो, पीएसजी), किलियन एम्बाप्पे (145 मिलियन युरो, पीएसजी), फिलिप कुटिन्हो (120 मिलियन युरो, बार्सिलोना), ओसुमाने डेंबेले (105 मिलियन युरो, बार्सिलोना), पॉल पोग्बा (105 मिलियन युरो, मॅन्चेस्टर युनायटेड यांनी ट्रान्सफर फी दिली होती.
संबंधित बातम्या
आयपीएल लिलाव : पहिला दिवस स्टोक्सचा, गेल, मलिंगावर बोली नाही
FIFA 2018 : फ्रान्सची फायनलमध्ये धडक, बेल्जियमवर 1-0 ने मात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)