Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोचा अनोखा अंदाज, बुर्ज खलिफावर चित्र झळकावून गर्लफ्रेन्डला दिल्या शुभेच्छा
Cristiano Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या गर्लफ्रेन्डचा, जॉर्जिना रॉड्रिगेजचा दुबईतील बुर्ज खलिफावर फोटो झळकावून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
![Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोचा अनोखा अंदाज, बुर्ज खलिफावर चित्र झळकावून गर्लफ्रेन्डला दिल्या शुभेच्छा Cristiano Ronaldo illuminates Burj Khalifa on girlfriend Georgina Rodriguez's birthday Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोचा अनोखा अंदाज, बुर्ज खलिफावर चित्र झळकावून गर्लफ्रेन्डला दिल्या शुभेच्छा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/3f47002283d4f2bdc60d935f7f709026_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
दुबई: फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेन्ड जॉर्जिना रॉड्रिगेजला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावर रोनाल्डोने त्याची गर्लफ्रेन्ड, जॉर्जिनाचा फोटो झळकावला. त्यासाठी क्रिस्टियानो रोनाल्डोने 50 हजार पाऊंड म्हणजे जवळपास 50 लाख रुपये खर्च केले आहेत.
क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेन्ड जॉर्जिना रॉड्रिगेज हिचा आज 28 वा वाढदिवस आहे. त्यामुळे क्रिस्टियानो रोनाल्डोने तिला आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या ठिकाणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच त्यांचे काही फोटोही व्हायरल होत असून त्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो, त्याची गर्लफ्रेन्ड जॉर्जिना रॉड्रिगेज आणि रोनाल्डोची मुलं दिसत आहेत.
तीन मिनीटांचा या व्हिडीओत जॉर्जिना दिसत असून 'Happy Birthday Geo' या मेसेजने हा व्हिडीओ संपतो. रोनाल्डोची गर्लफ्रेन्ड जॉर्जिना रॉड्रिगेज हिचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला आहे. रोनाल्डो आणि जॉर्जिनाची पहिली भेट 2016 साली झाली होती.
View this post on Instagram
क्रिस्टियानो रोनाल्डोने ज्या प्रकारे त्याच्या गर्लफ्रेन्डला शुभेच्छा दिल्या आहेत तो अंदाज त्याच्या चाहत्यांना आवडल्याचं दिसून येतंय. कारण रोनाल्डोचे या ठिकाणच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय. रोनाल्डोला जॉर्जिनापासून एक मुलगा झाला आहे. हे कुटुंब सध्या दुबईमध्ये वीकेंड हॉलिडे साजरा करत आहे.
दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीवर फोटो झळकणे हे जगभरातल्या अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींसाठी स्वप्नवत आहे. या इमारतीवर तीन मिनीटे फोटो झळकण्यासाठी किंवा आपल्याला हवा तो संदेश देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये मोजावे लागतात.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)