एक्स्प्लोर
भारावलेल्या मोहम्मद सिराजकडून विराट कोहलीचे आभार
क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने घरी भेट दिल्यामुळे मोहम्मद सिराज प्रचंड भारावून गेला होता.
हैदराबाद : रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी 'पुंडलिक भेटी पांडुरंग आले गा' अशी स्थिती रविवारी निर्माण झाली होती. क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सिराजच्या घरी भेट दिली. त्यामुळे मोहम्मद सिराज प्रचंड भारावून गेला होता.
सनरायझर्स हैदराबाद विरोधातील 'करो या मरो'च्या लढतीसाठी बंगळुरु संघ हैदराबादमध्ये होता. रविवारी प्रॅक्टिसनंतर पार्थिव पटेल, यजुवेंद्र चहल आणि विराट कोहली टोलीचौकी भागातील सिराजच्या घरी दाखल झाले. यावेळी त्यांनी हैदराबादी बिर्याणी, पथ्थर का गोश्त, कोर्मा, खुबानी का मेर्था आणि डबल का मीठा यासारख्या चविष्ट पदार्थांवर ताव मारला.
सिराजने ट्विटर, इन्स्टाग्रामवरुन विराट कोहलीचे आभार व्यक्त केले आहेत. त्याच्यासोबत काही फोटो आणि व्हिडिओही त्याने पोस्ट केले आहेत.
'धन्यवाद वीके भैया. हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गिफ्ट आहे.' अशा भावना गहिवरलेल्या सिराजने फोटो शेअर करताना व्यक्त केल्या आहेत.
@imVkohli & Team #RCB having dinner at M. siraj's house last night ❤😍#ViratKohli pic.twitter.com/cIijcpg64b
— Virushka Updates (@VirushkaUpdate_) May 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement