एक्स्प्लोर
Advertisement
जीवाला धोका, शस्त्रास्त्र बाळगण्याची परवानगी द्या : साक्षी धोनी
माझ्या जीवाला धोका आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मला रिव्हॉल्वर मिळावी, असं साक्षीचं म्हणणं आहे.
रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या पत्नीने शस्त्रास्त्र बाळगण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. रांची जिल्हा प्रशासनाकडे साक्षी धोनीने ही मागणी केली आहे.
रांचीमध्ये मी बहुतांश वेळा एकटीच राहते. कामाच्या निमित्ताने मला एकटंच बाहेर जावं लागतं. माझ्या जीवाला धोका आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मला रिव्हॉल्वर मिळावी, असं साक्षीचं म्हणणं आहे.
महत्त्वाचं म्हणजे महेंद्र सिंह धोनीच्या नावे शस्त्रास्त्र परवाना आहे.
झारखंडच्या रांचीमधील दलदली भागात असलेल्या फार्महाऊसमध्ये धोनी गेल्या वर्षी शिफ्ट झाला. यापूर्वी तो हर्मू हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असे.
क्रिकेट मॅचेस किंवा सरावाच्या निमित्ताने धोनी सातत्याने घराबाहेर असतो. देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा परदेशातही त्याचा दौरा असतो. प्रत्येक वेळी तो सहकुटुंब जात नसल्यामुळे साक्षी आणि त्यांची मुलगी झिवा घरी असतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement