एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Yuvraj & Dhoni: "मी आणि धोनी अजिबात क्लोज फ्रेंड नाही"; युवराज सिंहच्या खळबळजनक वक्तव्यानं चाहते हैराण

Yuvraj Singh MS Dhoni Friendship: युवराज सिंहनं एका मुलाखतीत महेंद्रसिंह धोनीसोबतच्या मैत्रीबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याच्यात आणि धोनीमध्ये कधीच घट्ट मैत्री नव्हती, असं त्यानं म्हटलं आहे.

Yuvraj Dhoni Friendship: सिक्सर किंग युवराज सिंहनं (Yuvraj Singh) एका मुलखतीत बोलताना महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि त्याच्या मैत्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्यात आणि धोनीमध्ये कधीच घट्ट मैत्री नव्हती, असं युवराज म्हणाला. युवराजच्या या वक्तव्यानं चाहते पुरते हैराण झाले आहेत. युवराज असं का म्हणाला? त्यानं नेमकं म्हणायचं काय आहे? अशा अनेक प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात काहुर माजवलं आहे. 

युवराज सिंहनं एका मुलाखतीत महेंद्रसिंह धोनीसोबतच्या मैत्रीबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याच्यात आणि धोनीमध्ये कधीच घट्ट मैत्री नव्हती, असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं असंही सांगितलं की, तो आणि धोनी मित्र होते कारण ते एकत्र क्रिकेट खेळले पण कधीच जवळचे, घट्ट मित्र नव्हते. यावेळी युवराजनं धोनीसोबत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील प्रदीर्घ काळ घालवल्याबद्दलही सविस्तर भाष्य केलं.

टीआरएस क्लिपवरील एका चॅट शोमध्ये युवी म्हणाला की, "मी आणि माही जवळचे मित्र नाही. आम्ही मित्र होतो, कारण आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचो पण माही आणि माझी लाईफस्टाईल खूप वेगळी होती. त्यामुळे आमच्यात घट्ट मैत्री झाली नाही. मैदानाबाहेर तुमचे सहकारी तुमचे चांगले मित्र असतीलच असं नाही. प्रत्येकाचीच जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. कोणत्याही एका संघाकडे पाहा, सर्व 11 खेळाडू एकत्र हँग आउट करताना तुम्हाला कधीच दिसत नाहीत.

युवराज म्हणाला की, "मी आणि माही जेव्हा मैदानात उतरायचो तेव्हा आम्ही दोघेही देशासाठी 100 टक्के द्यायचो. तो कर्णधार आणि मी उपकर्णधार. आमच्या निर्णयांमध्ये मतभेद असायचे. त्याचे काही निर्णय असे होते की, मला कधी आवडलेच नाही आणि माझे काही निर्णय त्याच्या समजण्याच्या पलीकडे होते. हे प्रत्येक संघासोबत घडतं. या काळात एकमेकांना मदत केल्याचा उल्लेखही युवराजनं केला आहे. यावेळी बोलताना युवराजनं एकदा धोनीला शतक पूर्ण करण्यात कशी मदत केली, हे सुद्धा सांगितलं आहे. त्यानं असंही सांगितलं की, धोनीनंही एकदा त्याचं अर्धशतक पूर्ण करताना त्याला साथ दिली होती.

...जेव्हा युवराजनं धोनीकडून घेतलेला करियरबाबत सल्ला

युवराजनं बोलताना आपल्या मुलाखतीत बोलताना काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यानं धोनी आणि त्याच्यातील एक किस्सा सांगितला. एख वेळ अशी होती की, युवराज सिंहनं धोनीकडून आपल्या करिअरबाबत सल्ला घेतला होता. त्यानं सांगितलं की, "जेव्हा मी करियकच्या शेवटच्या टप्प्यात होतो आणि त्यावेळी मी माझ्या भविष्याबाबत काहीच विचार केलेला नव्हता. त्यावेळी मी धोनीकडून कारकीर्दीबाबत सल्ला घेतलेला. त्यावेळी धोनीच होता ज्यानं मला सांगितलेलं की, निवड समिती सध्या तुझ्याबद्दल विचार करत नाही. माझी स्थिती अशी होती की, मला खरी परिस्थिती आणि काय चाललंय हे कळलं पाहिजे. हा किस्सा विश्वचषक 2019 च्या आधी होतं आणि ते खरं आहे. 

युवराज शेवटी म्हणाला की, "तोही निवृत्त झाला आहे. मीही निवृत्त झालोय. आपण भेटलो की, मित्रांसारखे भेटतो. नुकतंच आम्ही एकत्र एक जाहिरात देखील शूट केली. या काळात आम्हाला जुन्या गोष्टी आठवल्या, दोघांनीही खूप मस्ती केली."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धुळधाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Embed widget