WTC Final Scenario : WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ; न्यूझीलंड फायनलच्या शर्यतीतून बाहेर! भारताचं टेन्शन वाढलं
इंग्लंड आधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
WTC Points Table Update : 8-9 डिसेंबर WTC फायनलच्या शर्यतीत मोठी उलथापालथ झाली आहे. या दोन दिवसांत 2 कसोटी सामन्यांचे निकाल येऊ शकतात, ज्यामुळे 7 संघांच्या क्रमवारीवर परिणाम होऊ शकतो. भारताचा पराभव निश्चित आहे. दुसरीकडे इंग्लिश संघाने वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना तिसऱ्याच दिवशी 323 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता इंग्लंड WTC गुणतालिकेतही तो 5व्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, इंग्लंड आधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
वेलिंग्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर, इंग्लंड आता 45.25 पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड संघ 44.23 पीसीटीसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, दोन्ही संघ आधीच अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. न्यूझीलंड संघाने भारत दौऱ्यावर सलग तीन कसोटी सामने जिंकून जेतेपदाच्या शर्यतीत स्वत:ला सामील करून घेतले होते, मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवामुळे तेही शर्यतीतून बाहेर पडले. सध्या, टीम इंडिया 61.11 पीसीटीसह डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल आहे, परंतु ॲडलेड कसोटी सामना संपल्यानंतर यामध्ये बदल होईल.
England take an unassailable 2-0 lead in the series with a big win in Wellington 💥#WTC25 | #NZvENG 📝: https://t.co/7v7q9gnPSA pic.twitter.com/ivZSW5x5wy
— ICC (@ICC) December 8, 2024
भारत तिसऱ्या स्थानावर...
भारतीय संघ सध्या 61.11 टक्के गुणांसह WTC गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिका (59.26) आणि ऑस्ट्रेलिया (57.69) यांचा क्रमांक लागतो. ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाकडून होणारा दुसरा कसोटी सामना भारत हरला तर त्याचे सुमारे 4 टक्के गुणांचे नुकसान होईल. ऑस्ट्रेलिया जिंकल्यास भारत 57.29 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरेल. ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर येईल.
दक्षिण आफ्रिका जिंकल्यास काय होईल?
डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकाही आहे. पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही आपले स्थान मजबूत केले आहे. त्याने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर 221 धावांची आघाडी घेतली असून त्यांच्या 7 विकेट शिल्लक आहेत. या सामन्यात कोणताही मोठा अपसेट न झाल्यास आफ्रिकन संघ श्रीलंकेला 300 पेक्षा मोठे लक्ष्य देईल. दक्षिण आफ्रिकेच्या विकेटवर सामन्याच्या पाचव्या दिवशी एवढे मोठे लक्ष्य गाठणे कधीही सोपे नव्हते. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर ते 63.33 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचेल.