स्कॉटलँडने केला मोठा उलटफेर, भारतात होणाऱ्या विश्वचषकात वेस्ट इंडिजला नो एन्ट्री
World Cup 2023 : विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील धक्कादायक निकालाची नोंद झाली असून दोन वेळा जगज्जेता असलेल्या वेस्ट इंडिजचा संघ यावेळी पात्रता फेरीतच गारद झाला आहे.
World Cup 2023 : दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या वेस्ट इंडिजचे ( west indies) यंदाच्या विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न अपुर्ण राहणार आहे. झिम्बाब्वे येथे सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेत मोठा उलटफेर झाला आहे. स्कॉटलँडने वेस्ट इंडिजचा ( west indies) पराभव केला आहे. या पराभवामुळे वेस्ट इंडिजला भारतात होणाऱ्या विश्वचषकात भाग घेता येणार नाही. पात्रता फेरीतच वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आलेय.
सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात स्कॉटलँड संघाने वेस्ट इंडिजला 7 गडी राखून पराभूत केले. यासह वेस्ट इंडीज 2023 वनडे विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पहिल्या 2 वनडे विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला आता भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. कारण, पात्रता फेरीतच वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले.
Heartbreak for West Indies in Harare as Scotland beat them for the first time in an ODI and send them out of the race for #CWC23 👀#SCOvWI report 👇
— ICC (@ICC) July 1, 2023
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघाने 181 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 चेंडू राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 या दोन एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले आहे. एकेकाळी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा वेस्ट इंडिज संघ यंदा विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ खेळताना दिसणार नाही.
भारतात होणाऱ्या विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार आहे. दहा संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. यासाठी आठ संघ थेट पात्र ठरले आहेत. तर उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून पोहचणार आहे.
थेट पात्र होणारे 8 संघ कोणते ?
1. न्यूझीलंड 2. इंग्लंड 3. भारत 4. ऑस्ट्रेलिया 5. पाकिस्तान 6. दक्षिण अफ्रीका 7. बांगलादेश 8. अफगानिस्तान
क्वालिफायरल सुपर 6 मध्ये कोणते संघ पोहचले ?
1. श्रीलंका 2. वेस्ट इंडीज 3. झिम्बाब्वे 4. ओमान 5. स्कॉटलँड 6. नेदरलँड
क्वालिफायरमध्ये आव्हान संपलेले चार संघ कोणते ?
1. अमेरिका 2. आयरलँड 3. यूएई 4. नेपाळ
1. सुपर सिक्समध्ये सहा संघ कसे पोहचले ?
क्वालिफायर राउंडमध्ये दहा संघामध्ये स्पर्धा रंगली होती. या दहा संघाना अ आणि ब अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते. या दहा संघामध्ये 20 सामने झाले. दोन ग्रुपमधील आघाडीचे तीन तीन संघ सुपर - 6 साठी पात्र ठरले आहेत. आता सुपर 6 मध्ये वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे दोन संघ पात्र होण्याची शक्यता आहे.